​ वलूशा डिसूजा अजूनही शर्यतीत !‘टाईम टू डान्स’मध्ये जबरदस्त एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 08:09 AM2018-04-03T08:09:31+5:302018-04-03T13:39:31+5:30

‘फॅन’ या चित्रपटात शाहरूख खानच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री वलूशा डिसूजा आठवतेयं? ‘विंचू चावला’ या वैशाली सामंतच्या  गाण्यामुळे वलूशा ...

Wal-Marta D'Souza still in the race! Great Time in Time to Dance !! | ​ वलूशा डिसूजा अजूनही शर्यतीत !‘टाईम टू डान्स’मध्ये जबरदस्त एन्ट्री!!

​ वलूशा डिसूजा अजूनही शर्यतीत !‘टाईम टू डान्स’मध्ये जबरदस्त एन्ट्री!!

googlenewsNext
ॅन’ या चित्रपटात शाहरूख खानच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री वलूशा डिसूजा आठवतेयं? ‘विंचू चावला’ या वैशाली सामंतच्या  गाण्यामुळे वलूशा अचानक प्रकाशझोतात आली होती. पण यानंतर केवळ १९ व्या वर्षी लग्न करून वलूशाने सगळ्यांना धक्का दिला. पुढे काही वर्षे बॉलिवूडमधून पुरती दिसेनासी झाली. आता वलूशा कधीच परतणार नाही, असे सगळ्यांना वाटत असतानाच ती परतली. ‘फॅन’ या चित्रपटातून तिने पुनरागमन केले.  बॉलिवूडच्या शर्यतीतून आपण बाद झालेलो नसून आत्ता कुठे ही शर्यत सुरू झालीय, हेच जणू तिने या पुनरागमनातून सांगितले. आता वलूशाच्या हाती एक दुसरा मोठा चित्रपट लागल्याची खबर आहे. होय, कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ आणि सूरज पांचोली यांचा आगामी चित्रपट ‘टाईम टू डान्स’मध्ये वलूशाची एन्ट्री झाली आहे. या महिन्याच्या मध्यापासून या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार आहे आणि इसाबेल, सूरज आणि वलूशा या तिघांनीही याची जोरदार तयारीही सुरू केली आहे.



‘टाईम टू डान्स’बद्दल वलूशा कमालीची एक्ससाईटेड आहे. ‘फॅन’नंतर मी एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होते आणि ‘टाईम टू डान्स’ हा चित्रपट माझ्यापर्यंत चालून आला. मी ही संधी गमावणार नव्हतेच. या चित्रपटाची स्क्रिप्ट मला आवडली आणि मी तो साईन केला, असे वलूशाने सांगितले.

ALSO READ : ​कॅटरिनाच्या बहिणीसाठी ‘इतना तो बनता है’! ‘ओ ओ जाने जाना...’ घेऊन पुन्हा येतोय सलमान खान...!!

या चित्रपटात इसाबेल  बॉल रूम व लॅटिन डान्सरच्या भूमिकेत आहे तर सूरज एका स्ट्रीट डान्सरच्या रूपात.  कोरिओग्राफी आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाचा सहाय्यक स्टेनली डिकोस्टा हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. अर्थात यात रेमोचाही सहभाग आहे. होय, या चित्रपटाची कथा रेमोने लिहिली आहे.  भूषण कुमार निर्मित या चित्रपटाचे शूटींग शेड्यूल ५० दिवसांचे आहे. तीन वर्षांपूर्वी सूरजने ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा पहिला चित्रपट दणकून आपटला . साहजिकचं या चित्रपटाकडून सूरजला मोठ्या अपेक्षा आहेत. इसाबेलचा तर हा पहिलाचं चित्रपट असल्याने ती या प्रोजेक्टबद्दल कमालीची उत्सूक आहे.  

Web Title: Wal-Marta D'Souza still in the race! Great Time in Time to Dance !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.