'वाँटेड' मधील सलमानच्या हिरोईनला ओळखलंत का? बऱ्याच वर्षांनी आली कॅमेऱ्यासमोर; झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:02 IST2024-02-16T14:02:13+5:302024-02-16T14:02:40+5:30
सर्जरीनंतर तिचा चेहरामोहराच बदलला आहे.

'वाँटेड' मधील सलमानच्या हिरोईनला ओळखलंत का? बऱ्याच वर्षांनी आली कॅमेऱ्यासमोर; झाली ट्रोल
'वाँटेड' या ब्लॉकबस्टर सिनेमातील सलमान खानची हिरोईन आयशा टाकिया (Ayesha Takia)आठवतेय का? 37 वर्षीय आयशाला आता ओळखणंही कठीण झालं आहे. बऱ्याच वर्षांनी ही अभिनेत्री नुकतीच लेकासोबत विमानतळावर दिसली. यावेळी तिचा बदललेला चेहरा, वाढलेलं वजन यामुळे चाहत्यांनी तिला आधी ओळखलंच नाही. वाँटेड, डोर, दिल मांगे मोर अशा अनेक हिट सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. आता तिचा विमानतळावरील व्हिडिओ समोर आला आहे.
आयशा टाकियाने एकेकाळी तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले होते. वाँटेड सिनेमात तिला पाहून तर अनेक जण तिच्या प्रेमातच पडले होते. मात्र नंतर अभिनेत्री एकाएकी गायबच झाली. फरहान आजमीसोबत (Farhan Azmi) तिने निकाह करत इस्लाम धर्म स्वीकारला. तिला एक मुलगाही आहे. मध्यंतरी सर्जरीमुळे आयशाचा बदललेला चेहरा समोर आला होता. तेव्हा लोकांनी तिला खूप ट्रोल केलं होतं. आता बऱ्याच वर्षांनी ती कॅमेऱ्यासमोर आली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवर तिचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत तिला जबरदस्त ट्रोल केले आहे. आयशाची सर्जरी फेल झाल्याचंच तिच्या या लूकवरुन वाटत आहे. 'क्या से क्या हो गई' अशा कमेंट्स ट्रोलर्सने केल्या आहेत.
आयशाने २००९ साली फरहान आजमीसोबत लग्न केले. तेव्हा ती फक्त २३ वर्षांची होती. लग्नानंतर आयशाने फिल्मइंडस्ट्री सोडली. फरहान आजमी हा अबू आजमी यांचा मुलगा आहे. आयशाचे वडील आणि अबू आजमी हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे आयशा आधीपासूनच फरहानला ओळखत होती. ४ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.