ही होती भाईजानची पहिली गर्लफ्रेंड, वयाच्या १९ व्या वर्षी सलमान पडला होता प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 08:00 PM2019-10-28T20:00:00+5:302019-10-28T20:00:00+5:30

बॉलिवूडचा दबंग खान सलमान चित्रपटांव्यतिरिक्त कित्येक अभिनेत्रींसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचे नाव बॉलिवूडच्या बऱ्याच मोठ्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

This was Bhaijaan's first girlfriend, Salman khan fell in love at the age of 19 | ही होती भाईजानची पहिली गर्लफ्रेंड, वयाच्या १९ व्या वर्षी सलमान पडला होता प्रेमात

ही होती भाईजानची पहिली गर्लफ्रेंड, वयाच्या १९ व्या वर्षी सलमान पडला होता प्रेमात

googlenewsNext

बॉलिवूडचा दबंग खान सलमान चित्रपटांव्यतिरिक्त कित्येक अभिनेत्रींसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचे नाव बॉलिवूडच्या बऱ्याच मोठ्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. असं सांगितलं जातं की पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली त्याचे पहिले प्रेम होते. मात्र सोमी पहिलं प्रेम नसून अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी त्याचं पहिलं प्रेम होतं.

सलमान खान १९ वर्षाचा होता. त्यावेळी तो त्याच्या लाल रंगाच्या स्पोर्ट्स कारमध्ये तासनतास मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेज बाहेर कोणाचीतरी वाट पाहत उभा असायचा. ही मुलगी म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी शाहीन जाफ्री. शाहीन जाफ्री ही दिग्गज अभिनेते शहीद जाफ्रीची भाची आहे.


सलमान खान वयाच्या १९ व्या वर्षी शाहीन जाफ्रीच्या प्रेमात वेडापीसा झाला होता. तो तिच्या प्रेमात इतका बुडाला होता कि तो तासनतास तिच्यासोबत घालवायचा आणि तिची वाट पाहत बसायचा. सलमानने शाहिनला घरच्यांनादेखील भेटवलं होतं आणि सलमानचे वडील सलीम खान यांनी देखील त्यांच्या नात्याला हिरवा कंदील दिला होता. तसेच शाहीनचे कुटुंब सुद्धा ह्या नात्यामुळे खुश होते. फक्त घरातले ते मॅच्युअर होण्याची वाट पाहत होते.


वयाच्या २१ व्या वर्षी सलमान शाहीनसोबत लग्न करणार होता आणि या प्रेमकथेत ट्विस्ट आला. यामागचे कारण म्हणजे १९८० ची मिस वर्ल्ड संगीता बिजलानी. सीरॉक हेल्थ क्लब जिथे सलमान आणि शाहीन एकत्र जात होते. तिथेच संगीता बिजलानी सुद्धा येऊ लागली. त्यावेळी संगीता बिजलानी आपल्या आयुष्याचा खूप कठीण प्रसंगातून जात होती. कारण तिचे ब्रेकअप झाले होते बॉयफ्रेंड बिंजू अली सोबत. त्यामुळे संगीत बिजलानीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्याचवेळी तिला सावरण्यासाठी संगीताशी काळजीपोटी बोलत होता. मात्र त्याचवेळी सलमानला तिच्याकडे आकर्षित होत गेला. कारण संगीता त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती, ती मॅच्युर गोष्टी करायची त्यामुळे सलमानला तिच्यासोबत बोलायला खूप आवडू लागले होते.

सलमान आता संगीतासोबत जास्त वेळ घालवायला लागला होता. तो फक्त हेल्थ क्लबच नाही तर त्याच्या बाहेर सुद्धा दोघे अनेकदा भेटत होते. याच कारणामुळे शाहीनने हळूहळू सलमानपासून दूर रहायला सुरुवात केली. जेव्हा शाहीनने अनेकवेळा सलमानला संगीतापासून दूर राहायला सांगितले होते. तरीसुद्धा सलमानने तिचे ऐकले नाही तेव्हा शेवटी एकदाचे शाहीनने ठरवले की सलमानसोबत ब्रेकअप करायचे.


शाहीनने सलमानला सोडले. तिने आपल्या करिअरवर लक्ष दिले आणि कॅटे पॅसेफिक एअरलाईन्स जॉईन केले. खरंतर अनेक वर्षांनंतर सुद्धा सलमानने शाहीनसोबत मैत्री तोडली नाही. ते आजसुद्धा चांगले मित्र आहेत.

असं बोललं जातं कि कियारा अडवाणी जी शाहीनच्या बहिणीची मुलगी आहे, तिला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी सलमान खानने खूप मदत केली. ही गोष्ट कियाराने स्वतः अनेकदा मुलाखतीत सांगितली आहे.

Web Title: This was Bhaijaan's first girlfriend, Salman khan fell in love at the age of 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.