व्हाईट हाऊसमध्ये सिनेमाचे शुटिंग करणा-या कलाकारांच्या यादीत हा खान ठरला पहिला भारतीय अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2017 11:37 AM2017-04-01T11:37:33+5:302017-04-01T17:08:06+5:30
सिनेमाच्या शुटिंगसाठी एरव्ही नयनरम्य लोकेशन्स, परदेशातील डेस्टिनेशन, प्रसिद्ध बीच किंवा पर्यटन स्थळावर शुटिंग केलं जातं. मात्र एका सिनेमाचं शुटिंग ...
स नेमाच्या शुटिंगसाठी एरव्ही नयनरम्य लोकेशन्स, परदेशातील डेस्टिनेशन, प्रसिद्ध बीच किंवा पर्यटन स्थळावर शुटिंग केलं जातं. मात्र एका सिनेमाचं शुटिंग चक्क अमेरिकेच्या प्रसिद्ध व्हाईट हाऊसमध्ये करण्यात आलं आहे. हे कसं काय शक्य आहे? वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल ! आजवर जे कोणत्याही निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेत्याला जमलं नाही ते एका बॉलिवूडच्या खाननं करुन दाखवलं आहे. त्याने परदेशातील नेहमीच्या ठिकाणावर सिनेमाचं शुटिंग न करता थेट व्हाईट हाऊसमध्येच त्याच्या सिनेमाचं शुटिंग केलंय. आता हा खान म्हटल्यावर आमिर, शाहरुख किंवा सलमान असेल असं तुम्हाला वाटणं साहजिकच आहे. मात्र यापैकी कोणत्याही खानला ते जमलेलं नाही. तर ते धाडस करुन दाखवलं आहे बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा भाऊ अरबाज खान याने. जे दिग्गजांना जमले नाही ते अरबाजने शक्य करुन दाखवले आहे.. अरबाजच्या 'जीना इसी का नाम है' या सिनेमाचं शुटिंग व्हाईट हाऊसमध्ये करण्यात आले होते. केशव पानेरी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून इंडो अमेरिकन को-प्रॉडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाचं शुटिंग वेस्ट वर्जिनिया, न्यूयॉर्क सिटी आणि मेरी लँड अशा ठिकाणीही झाले होते.मात्र सिनेमातील एका खास भागाचे शुटिंग व्हाईट हाऊसमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये सिनेमाचे शुटिंग करणा-या कलाकारांच्या यादीत अरबाज खान हा पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे. व्हाईट हाऊसमध्ये सिनेमाच्या शुटिंगची आखणी करणे, सगळी व्यवस्था करणे ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. सिनेमाच्या टीमला यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.दिग्दर्शक केशव पानेरीनेतर जवळपास 15 वेळा व्हाईट हाऊसमध्ये शुटिंगसाठी अर्ज करावे लागले होते. यानंतर सगळ्या गोष्टींची शहानिशा करुन या सिनेमाच्या शुटिंगसाठी मंजूरी देण्यात आली होती. शुटिंगवेळी काहीही अघटित घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली होती. या सिनेमात अरबाज खानने एका अमेरिकन व्यावसायिकाची भूमिका साकारली होती. अरबाजसह मंजिरी फडणीस, हिंमाशू कोहली, प्रेम चोप्रा, सुप्रिया पाठक, रती अग्निहोत्री आणि आशुतोष राणा यांच्याही या सिनेमात भूमिका होत्या.