सुशांतला ब्लॅकमेल करत होता सॅम्युअल हाओकिप, रात्री 2 वाजता सोडले होते घर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 02:07 PM2020-09-15T14:07:15+5:302020-09-15T14:14:54+5:30
सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू होऊन तीन महिने उलटून गेले आहेत.
सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू होऊन तीन महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करते आहे. लवकरच सीबीआय आपल्या तपासाचा रिपोर्ट सादर करणार आहे. एनसीबीने ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्तीला अटक केली आहे. तर त्याचवेळी सीबीआयच्या संशयाची सुई सुशांतचा मित्र सॅम्युअल हाओकिपकडे वळली आहे. सॅम्युअल हाओकिप सुशांतला ब्लॅकमेल करत असल्याची माहितीसमोर येते आहे. ही गोष्ट दोघांमध्ये झालेल्या चॅटमुळेसमोर आली आहे.
रात्री 2 वाजता सुशांतचे घरातून बाहरे पडला सॅम्युअल
सीबीआय चौकशी असे कळले की, सुशांतच्या आयुष्यात सॅम्युअल हाओकिपची एंट्री मित्र आणि कायदाशीर सल्लागार म्हणून झाली होती. सॅम्युअल हा कायदा तज्ञ आहे. सुशांतच्या फार्महाऊसचा कॉन्ट्रॅक्ट सॅम्युअलने तयार केले होते. पण असे मानले जाते की सुशांत आणि सॅम्युअलमधील संबंध बिघडले होते. याच कारणामुळे 2019 ला रात्री दोनच्या आसपास सॅम्युअलने सुशांतच्या घरातून बाहेर पडला होता. एवढेच नाही तर सुशांतने एकदा सॅम्युअलचा फोनदेखील आपल्या ताब्यात घेतला होता.
फोनमध्ये मिळाले मेसेजेस
सीबीआय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सॅम्युअल हाओकिपची सतत चौकशी करते आहे. त्याचे आणि सुशांतचे अनेक चॅट्स मिळाले आहेत ज्या वरुन तो ब्लॅकमेल करत असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप हे मेसेजेस काय आहेत याचा खुलासा सीबीआयने केला नाही.
SSR death probe: Samuel Haokip's role under the lens of the CBI: Sources.
— TIMES NOW (@TimesNow) September 15, 2020
Siddhant with details. pic.twitter.com/dv8V2HDWn0
11 आणि 12 जूनला सुशांतने दिपेशकडे व्यक्त केली होती चिंता
टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या मृत्यूच्या तीन दिवसांआधी स्टाफ दिपेस सावंतला त्याने फार्महाऊसचे कॉन्ट्रॅक्ट संपवण्यासाठी सांगितले होते. तिकडचे फर्नीचर विकून टाक आणि तीन कुत्र्यांना अडॉप्शन सेंटरमध्ये पाठव. सुशांतने हे केले कारण त्याला वाटले की फार्महाऊसच्या नावाने सॅम्युअलने त्याचा विश्वासघात केला आहे.
सुशांतच्या फार्म हाऊसमधून वस्तू जप्त
तपास पथकाला सुशांतच्या फार्म हाऊसमधून हुक्का पिण्याच्या वस्तूही सापडल्या आहेत. एनसीबी ड्रग्स कनेक्शनच्या संदर्भात अनेक कान्याकोपऱ्यातून सातत्याने चौकशी करत असते.. यापूर्वी एनसीबीने आपल्या रिमांड कॉपीमध्ये दावा केला होता की, रिया आणि इतर साथीदार सुशांत सिंग राजपूत यांच्या सांगण्यावरून ड्रग्ज मागत असत, हाच जबाब रिया आणि अटक केलेल्या लोकांनी एनसीबीला दिले आहेत.