Sonakshi-Zaheer Wedding : जहीरसोबतच्या नात्यावर नाराज होते शत्रुघ्न सिन्हा? लेकीच्या लग्नावर सोडलं मौन, म्हणाले - "जो तणाव होता तो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 17:41 IST2024-06-22T17:40:23+5:302024-06-22T17:41:14+5:30
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती अभिनेता जहीर इक्बाल(Zaheer Iqbal)सोबत २३ जून रोजी लग्नगाठ बांधणार आहे.

Sonakshi-Zaheer Wedding : जहीरसोबतच्या नात्यावर नाराज होते शत्रुघ्न सिन्हा? लेकीच्या लग्नावर सोडलं मौन, म्हणाले - "जो तणाव होता तो..."
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती अभिनेता जहीर इक्बाल(Zaheer Iqbal)सोबत २३ जून रोजी लग्नगाठ बांधणार आहे. जेव्हापासून तिच्या लग्नाच्या वृत्ताने जोर धरला तेव्हापासून अभिनेत्रीचे कुटुंबीय त्यांच्या नात्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता त्यांच्या लग्नाआधी ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांनी पुन्हा एकदा मौन सोडले आहे. त्यांनी खुलासा केला की लग्न २३ जून रोजी नाही.
शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम यांनी मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांच्या लग्नाला परवानगी दिली आहे. सुमारे २ आठवडे या लग्नाची चर्चा सुरू होती. आता आपल्या मुलीला निरोप देण्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा या प्रकरणावर बोलले आहेत. त्यांनी कबूल केले की कुटुंबात तणाव होता, परंतु आता सर्व काही ठीक आहे.
अभिनेत्याने कुटुंबात तणाव असल्याचं केलं मान्य
खरेतर, नुकतेच शत्रुघ्न सिन्हा यांनी टाइम्स नाऊशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नावरून घरात काहीसा तणाव असल्याचे मान्य केले. सोनाक्षीच्या लग्नाची तारीख २३ जून नसल्याचा खुलासाही शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. ते म्हणाले की, '२३ जून रोजी कोणतेही लग्न नाही, रिसेप्शन आहे ज्यात आम्ही सर्वजण आमच्या कुटुंबासह उपस्थित राहू.' शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, 'लग्न प्रत्येकाच्या घरी होतात. लग्नाआधी भांडणंही होतात. आता सगळं ठीक आहे, जे काही टेन्शन होतं ते दूर झालंय. काहीच अडचण नाही. हे सर्व प्रत्येक लग्नात घडते. ती (सोनाक्षी) शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे, याचा अर्थ असा नाही की तिला आयुष्यात जे हवे आहे ते तिला मिळू शकत नाही. २३ जूनला आम्ही खूप मजा करणार आहोत.
सोनाक्षीला तिचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार
सोनाक्षी आणि शत्रुघ्न यांच्यातील मतभेदाच्या अफवा पहिल्यांदा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा अभिनेत्याने सांगितले की त्याला त्याच्या मुलीच्या लग्नाबद्दल माहित नाही. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न यांनी आपल्या कुटुंबाविरुद्ध 'खोटे' पसरवणाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले की, 'मला सांग, हा जीव कोणाचा? ही माझी एकुलती एक मुलगी सोनाक्षीचे आयुष्य आहे, जिचा मला खूप अभिमान आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ती मला तिचा आधारस्तंभ म्हणते. लग्नाला मी नक्कीच उपस्थित राहीन. तिला तिचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मी तिच्या निर्णयाचे समर्थन करतो. आपल्या मुलीच्या भावी पतीबद्दल प्रतिक्रिया देताना शत्रुघ्न म्हणाले, 'सोनाक्षी आणि जहीरला त्यांचे आयुष्य एकत्र जगावे लागेल, ते एकत्र छान दिसतात.'
२३ जून रोजी होणाऱ्या रिसेप्शनसाठी या जोडप्याने सलमान खान, हनी सिंग, हीरामंडी कलाकार, हुमा कुरेशी, संजय लीला भन्साळी, डेझी शाह, पूनम ढिल्लन आणि इतर अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केले आहे.