watch : ​ड्रामा अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन! ‘बादशाहो’चा टीजर आला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2017 08:20 AM2017-06-20T08:20:50+5:302017-06-20T13:51:22+5:30

तुमची आमची प्रतीक्षा संपलीय. होय, ‘बादशाहो’चा दमदार टीजर रिलीज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक रिलीज झालेले पोस्टर आपण बघतो आहोत. आज या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला.

watch: Drama and Action! 'Badshaho' teaser got !! | watch : ​ड्रामा अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन! ‘बादशाहो’चा टीजर आला!!

watch : ​ड्रामा अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन! ‘बादशाहो’चा टीजर आला!!

googlenewsNext
मची आमची प्रतीक्षा संपलीय. होय, ‘बादशाहो’चा दमदार टीजर रिलीज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक रिलीज झालेले पोस्टर आपण बघतो आहोत. आज या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. या संपूर्ण टीजरमध्ये केवळ आणि केवळ अजय देवगण दिसतो आहे. त्याच्या दमदार आवाजातील संवादाने या टीजरची शान आणखीच वाढली आहे. इलियाना डिक्रूज ते विद्युत जामवाल असे सगळेत यात दिसताहेत. सनी लिओनीही तिच्या हॉट लूकमध्ये दिसतेय. अजय देवगण, इलियाना, इमरान हाश्मी, इशा गुप्ता, विद्युत जामवाल व संजय मिश्रा असे सहा जण सरकारचा सोन्याचा खजाना चोरण्याच्या प्रयत्नात आहेत. या लोकांकडे हा खजाना चोरण्यासाठी केवळ ९६ तास आहेत. आता या ९६ तासांत हे सगळे जण आपल्या प्लानमध्ये यशस्वी होतात वा नाही, हीच या चित्रपटाची कथा आहे. ही सहा जणांची गँग कशी एकत्र येते, ते एकत्र आहेत की वेगवेगळे याचे उत्तर कदाचित ट्रेलरमध्ये आपल्याला मिळेल. तोपर्यंत हा टीजर तुम्ही पाहायलाच हवा. 



 अजयशिवाय यात इमरान हाश्मी, इशा गुप्ता, विद्युत जामवाल, इलियाना डिक्रूज मुख्य भूमिकेत आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचा पहिला प्रमो सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’सोबत जारी केला जाणार असल्याची पक्की खबर आहे. ‘बादशाहो’शिवाय शाहरूख खानच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या आगामी चित्रपटाचा पहिला ट्रेलरही ‘ट्यूबलाईट’सोबत रिलीज होणार आहे. तूर्तास आपण ‘बादशाहो’चा टीजर पाहूयात. यातील अजय देवगण तुम्हाला कसा वाटला, हे सांगायला विसरू नका.

Web Title: watch: Drama and Action! 'Badshaho' teaser got !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.