घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता 'फुकरे 3' सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 18:47 IST2023-11-23T18:43:57+5:302023-11-23T18:47:32+5:30
'फुकरे 3' चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल होत आहे.

घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता 'फुकरे 3' सिनेमा
बॉक्स ऑफिसवर सध्या बॉलिवूडचा बोलबाला पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चाहते 'फुकरे 3' सिनेमासाठी उत्सुक आहेत. आता 'फुकरे 3' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर हा चित्रपट अॅमझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. अॅमझॉन प्राइम व्हिडीओने चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. 'फुकरे 3' हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे.
sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'फुकरे 3'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 95.30 कोटींचा व्यवसाय केला होता. तर जगभरात 127.75 कोटी रुपयांचा आकडा गाठला. मृगदीप सिंह यांनी 'फुकरे 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. वरुण शर्मा, पुलकित सम्राट, ऋचा चड्ढा, मंजोत सिंह आणि पंकज त्रिपाठी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
या सिनेमाचा पहिला आणि दुसरा भाग पाहिला नसेल तरी तिसरा भाग तुम्ही पाहू शकता. फुकरे हा 2013 मध्ये रिलीज झाला. त्यानंतर 2017 मध्ये फुकरे रिटर्न्स रिलीज झाला. आता 5 वर्षांनंतर त्याचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे. अली फजल मात्र या भागात दिसणार नाही.