शूटिंग दरम्यान सेटवर मस्ती करताना दिसली सनी लिओनी, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 15:44 IST2021-01-05T15:43:57+5:302021-01-05T15:44:50+5:30
सनी लिओनी शूटिंगच्या सेटवर बरीच मस्ती करताना दिसली.

शूटिंग दरम्यान सेटवर मस्ती करताना दिसली सनी लिओनी, व्हिडीओ व्हायरल
सनी लिओनीचे जगभरात चाहते आहेत. संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान पती आणि मुलांसमवेत ती अमेरिकेत होती. सनी आता मुंबईत आपल्या कामावर परतली आहे. सनी सध्या शुटिंगमध्ये मग्न आहे. सनी लिओनी शूटिंगच्या सेटवर बरीच मस्ती करताना दिसली. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सनीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती स्टीलच्या प्लेट आणि हातात हंडा घेऊन डान्स करताना दिसते आहे. हा व्हिडिओ पाहून सनी तिचे काम एन्जॉय करताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करताना सनीने लिहिले,'मस्ती ऑन द सेट्स'
सनी लिओनीने तिच्या पुढच्या ‘अनामिका’ सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा दिग्दर्शक विक्रम भट्ट बनवणार आहेत यात सनीसोबत सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाशिवाय सनी लिओनीकडेही काही दक्षिण चित्रपट आहेत. आता चाहते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर सनी लिओनला पाहण्याची आतुरतेने वाट पाहतील.
सनी लिओनी शेवटची नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टीसोबत 2019 मध्ये ‘मोतीचूर चकनाचूर’ चित्रपटात दिसली होती. या सिनेमात त्याने एक कॅमिओ केला होता. सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.