जर त्या रात्री सिल्क स्मिता..; विद्या बालन-प्रतीक गांधीची धम्माल केमिस्ट्री! 'दो और दो प्यार'चा ट्रेलर बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 12:32 PM2024-04-06T12:32:43+5:302024-04-06T12:33:35+5:30

विद्या बालन - प्रतीक गांधी - इलियाना डिक्रूझ यांची धम्माल केमिस्ट्री असलेला 'दो और दो प्यार'चा ट्रेलर बघाच

Watch the trailer of 'Do Aur Do Pyaar' Vidya Balan Pratik Gandhi's sizzling chemistry! | जर त्या रात्री सिल्क स्मिता..; विद्या बालन-प्रतीक गांधीची धम्माल केमिस्ट्री! 'दो और दो प्यार'चा ट्रेलर बघाच

जर त्या रात्री सिल्क स्मिता..; विद्या बालन-प्रतीक गांधीची धम्माल केमिस्ट्री! 'दो और दो प्यार'चा ट्रेलर बघाच

विद्या बालन - प्रतीक गांधी यांचा आगामी सिनेमा 'दो और दो प्यार' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने विद्या बालन अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. काहीच दिवसांपुर्वी 'दो और दो प्यार'चा टिझर आलेला. आता 'दो और दो प्यार' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये विद्या बालन-प्रतीक गांधी यांची धम्माल रोमँटिक केमिस्ट्री बघायला मिळतेय. 

'दो और दो प्यार' च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की प्रतीक - विद्या यांचं लग्न झालंय. पण दोघांचा संसार सुरळित सुरु नाहीय. या दोघांच्या संसारात खटके उडत असतात. अशातच पाहायला मिळतं की, दोघांचं बाहेर एका वेगळ्याच व्यक्तीशी अफेअर सुरु होतं. दोघंही या गोष्टीचा एकमेकांना पत्ता लागू देत नाहीत. मग पुढे काय होणार? दोघांचं अफेअर एकमेकांना माहित पडणार का? आणि पुढे काय गोंधळ होणार?  याची उत्तरं सिनेमात बघायला मिळायला मिळतील. 

'दो और दो प्यार' मध्ये प्रतीक गांधी आणि विद्या बालन प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेत्री इलियाना डीक्रूझ सुद्धा विशेष भूमिकेत आहे. अभिनेता सेंधील राममूर्ती सुद्धा सिनेमात झळकतोय. शीर्षा ठाकूर्ता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. १९ एप्रिल २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. विद्या बालनचे चाहते तिला मोठ्या गॅपने मोठ्या पडद्यावर बघायला उत्सुक आहेत.

Web Title: Watch the trailer of 'Do Aur Do Pyaar' Vidya Balan Pratik Gandhi's sizzling chemistry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.