WATCH : ४० च्या दशकातील ‘ट्रेन’ अन् कंगना राणौतचा ‘टिप्पा’ डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 08:30 AM2017-02-02T08:30:54+5:302017-02-02T14:00:54+5:30

होय, ‘रंगून’चे चौथे गाणे तुम्हाला ऐकायला आणि पाहायलाच हवे. आज हे नवे गाणे रिलीज झाले. ‘रंगून’च्या या ‘टिप्पा’ गाण्याला तुम्ही कंगना राणौत हिचे ‘छय्या छय्या’असेही म्हणू शकता. कारण ‘टिप्पा....’ हे गाणे ट्रेनच्या छतावर चित्रीत करण्यात आले आहे.

WATCH: 'Tiger' dance of '40th-decade' and Kangna Ranaut! | WATCH : ४० च्या दशकातील ‘ट्रेन’ अन् कंगना राणौतचा ‘टिप्पा’ डान्स!

WATCH : ४० च्या दशकातील ‘ट्रेन’ अन् कंगना राणौतचा ‘टिप्पा’ डान्स!

googlenewsNext
य, ‘रंगून’चे चौथे गाणे तुम्हाला ऐकायला आणि पाहायलाच हवे. आज हे नवे गाणे रिलीज झाले. ‘रंगून’च्या या ‘टिप्पा’ गाण्याला तुम्ही कंगना राणौत हिचे ‘छय्या छय्या’असेही म्हणू शकता. कारण ‘टिप्पा....’ हे गाणे ट्रेनच्या छतावर चित्रीत करण्यात आले आहे. ‘टिप्पा....’ हे गाणे गुलजार यांनी लिहिलेले ‘छय्या छय्या...’ची हमखास आठवण करून देते. कंगणाचे हे गाणे पाहिल्यावर तुम्हाला  ‘छय्या छय्या...’तील हॉट मलायका अरोरा आणि रोमॅन्टिक शाहरूख खान आठवल्याशिवाय राहणार नाही. ‘छय्या छय्या...’वर शाहरूखला रेल्वेच्या टपावर थिरकायला लावणाºया फराह खान हिनेच ‘टिप्पा....’  या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे, हेही इथे सांगायलाच हवे.
गाण्यातील ही ट्रेन ४० च्या दशकातील दिसायला हवी होती. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना यासाठी बराच खटाटोप करावा लागला. ते सांगतात, ‘रंगून’हा दुसºया महायुद्धादरम्यानची एक प्रेमकथा आहे. निश्चितपणे ‘टिप्पा....’हे गाणे रेल्वेच्या छतावर चित्रीत करायचे म्हटल्यार ही ट्रेन सुद्धा ४० च्या दशकातील दिसायला हवी होती. हे आमच्यासाठी आव्हान होते. अखेर आम्ही रेल्वेविभागाकडून परवानगी मिळवली आणि मग माझी कला विभागाची टीम कामाला लागली. त्यांनी या रेल्वेला ४० च्या दशकातील लूक दिला. तिला दोन्हीकडून रूंद केले. आता यामुळे ती रेल्वेमार्गातल्या सिग्नलवर आदळण्याची शक्यता होती. पण कसेबसे हे दिव्य आम्ही पार पाडले.



‘रंगून’ची ‘ब्लडी हेल’,‘ये इश्क है’ आणि ‘मेरे पिया गए इंग्लंड’ अशी तीन गाणी आधीच रिलीज झाली आहेत. आता ‘टिप्पा’ या चौथ्या गाण्यात कंगनाचा अनोखा अंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विशाल भारद्वाज यांचा पीरियड रोमॅन्टिक ड्रामा असलेल्या या चित्रपटात सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना राणौत अशा तिघांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.  यात ‘वॉर’ आहे आणि ‘लव्ह’ सुद्धा. यात शाहिद एका लष्करी अधिकाºयाच्या तर कंगना मिस ज्युलियाच्या भूमिकेत आहे. मिस ज्युलिया ही ४० च्या दशकातील एक स्टंट वूमन होती.

ALSO READ : Rangoon Making of : गोठवणाऱ्या थंडीत अरूणाचल प्रदेशमध्ये अशी झाली ‘रंगून’ ची शूटींग...
सैफ अन् शाहीदच्या मिशांमुळे इतकी का वैतागली कंगना राणौत?

Web Title: WATCH: 'Tiger' dance of '40th-decade' and Kangna Ranaut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.