Watch Video : अबरामने ‘या’ चित्रपटातून पप्पा शाहरूख खानसोबत केला डेब्यू!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2017 01:58 PM2017-05-27T13:58:47+5:302017-05-27T19:28:47+5:30
आज शाहरूख खानच्या लाडक्या अबरामचा वाढदिवस आहे. आज अबराम चार वर्षांचा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अबराम ज्या पद्धतीने कॅमेरा फेस करीत आहे, त्यावरून तो आगामी काळात बॉलिवूडमध्ये धूम उडवून देईल यात शंका नाही.
आ शाहरूख खानच्या लाडक्या अबरामचा वाढदिवस आहे. आज अबराम चार वर्षांचा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अबराम ज्या पद्धतीने कॅमेरा फेस करीत आहे, त्यावरून तो आगामी काळात बॉलिवूडमध्ये धूम उडवून देईल यात शंका नाही. पप्पा शाहरूखसोबत लॉन्ग ड्राइव असो वा क्रिकेटच्या मैदानावर मस्ती असो अबराम कधीच कॅमेºयाला घाबरला नाही. उलट आत्मविश्वासाने त्याने कॅमेरा फेस केला आहे. एवढेच नव्हे तर अबरामने बॉलिवूडपटात डेब्यूही केला आहे. कदाचित ही बाब कोणालाच माहिती नसेल, मात्र हे खरे आहे. शाहरूखच्या ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटात त्याने पप्पासोबत डेब्यू केला आहे.
अबरामचा डेब्यू कोणालाच आठवत नसेल, पण हे खरे आहे. वास्तविक अबरामने डेब्यू केलेल्या चित्रपटाच्या अखेर फराह खान तिच्या चित्रपटांमध्ये दाखविते तसाच काहीसा केला आहे. म्हणजेच फराह चित्रपटाच्या अखेरीस स्वत:सह चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्सना दाखवित असते. या चित्रपटातही तिने अखेरीस सर्वांना दाखविले आहे. मात्र याचदरम्यान सेटवर अबरामही उपस्थित होता. तेव्हा फराहने निर्णय घेतला की, अबरामचीही झलक दाखविली जावी. अशाप्रकारे अबरामचा बॉलिवूड डेब्यू करण्यात आला आहे. अबरामप्रमाणेच त्याचा मोठा भाऊ आर्यनचाही असाच काहीसा डेब्यू झालेला आहे.
आर्यनने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात शाहरूखच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. वास्तविक अबरामप्रमाणेच आर्यनही कॅमेºयाला फेस करण्यास अजिबात घाबरत नाही. असो अबरामने त्याच्या पहिल्या ‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटात ज्या पद्धतीने स्पेशल अपीयरेंस दिली आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.