अमित शाह यांच्या आग्रहाखातर आशा भोसले यांनी गायलं, "अभी ना जाओ छोडकर..." हे गाणं, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 11:19 AM2024-03-07T11:19:04+5:302024-03-07T11:22:53+5:30

गृहमंत्री अमित शहांच्या आग्रहाखातर आशा भोसलेंनी 'अभी ना जाओ छोडकर..' हे गाणं गायलं.

Watch video : Asha Bhosle sings 'Abhi Na Jao Chhod Kar' for Amit Shah at photo biography release | अमित शाह यांच्या आग्रहाखातर आशा भोसले यांनी गायलं, "अभी ना जाओ छोडकर..." हे गाणं, व्हिडीओ व्हायरल

अमित शाह यांच्या आग्रहाखातर आशा भोसले यांनी गायलं, "अभी ना जाओ छोडकर..." हे गाणं

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायकांची गणना आशा भोसले यांच्या नावाशिवाय अपूर्णच. बऱ्याच काळापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत जी आजही लोकांना ऐकायला आवडतात. सामान्य नागरिकच काय तर देशाचे गृहमंत्री अमित शाहदेखीलआशा भोसले यांचे चाहते आहेत. नुकतेच गृहमंत्री अमित शहांच्या आग्रहाखातर आशा भोसलेंनी 'अभी ना जाओ छोडकर..' हे गाणं गायलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 आशा भोसले यांच्या 'बेस्ट ऑफ आशा' या छायाचित्रणाचे प्रकाशन बुधवारी मुंबईत करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या छायाचित्रणाचे अनावरण करण्यात आलं. 'बेस्ट ऑफ आशा' या पुस्तकात प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी टिपलेल्या आशा भोसले यांच्या छायाचित्रांचे संकलन आहे. आशा भोसलेंची गायनशैली, त्यांची गाणी, त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये टिपण्यात आला आहे. 

आशा भोसले यांच्या विविध भावमुद्रा आणि वेगवेगळ्या छायाचित्रातून त्यांचे जीवन आणि गाणे या पुस्तकातून उलघडण्यात आला आहे. आशा भोसले यांनी हिंदी, मराठीसह त्यांनी बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन या भाषांतील गाणी गायली आहेत.  आशाताईंनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विशेष स्थानं निर्माण केलं आहे. त्यांची सदाबहार गाणी प्रेक्षक आवडीनं ऐकतात. आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 

Web Title: Watch video : Asha Bhosle sings 'Abhi Na Jao Chhod Kar' for Amit Shah at photo biography release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.