watch video: भाभी मत बुलाओ ना...! अन् दीपिकाने पापाराझींना केली विनंती...!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:24 PM2018-12-02T12:24:05+5:302018-12-02T12:24:44+5:30
लग्नानंतर मीडिया सर्रास दीपिकाला ‘भाभी’ म्हणून संबोधू लागला आहे. पण दीपिकाला मात्र हे फार रूचलेले नाही. होय, कालच्या रिसेप्शनमध्ये तरी हेच दिसले.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आता मिसेस अॅण्ड मिस्टर भवनानी झालेत. गत १४ व १५ नोव्हेंबरला दीपवीर लग्नबेडीत अडकले. या लग्नाला आता उणेपुरे १५ दिवस झालेत. पण अद्यापही या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु आहे. काल १ डिसेंबरला दीपवीरने बॉलिवूडच्या मित्रमंडळींसाठी मुंबईत खास रिसेप्शन दिले. हे त्यांच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन होते. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सपासून तर क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हजेरी लावली.
लग्नानंतर मीडिया सर्रास दीपिकाला ‘भाभी’ म्हणून संबोधू लागला आहे. पण दीपिकाला मात्र हे फार रूचलेले नाही. होय, कालच्या रिसेप्शनमध्ये तरी हेच दिसले. या रिसेप्शनमध्ये दीपवीर दोघांनीही मीडिया प्रतिनिधींसोबत धम्माल मस्ती केली. त्यांच्यासोबत पोझही दिली. यावेळी काही पापाराझींनी दीपिकाला ‘भाभी’ संबोधले. यावर ‘भाभी मत बुलाओ ना’, असे दीपिका हसत हसत त्यांना म्हणताना दिसली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे.
यापूर्वी मुंबईतीलचं दुसºया रिसेप्शनमध्येही पापाराझींनी दीपिकाला ‘भाभी’ संबोधले होते. मीडियाच्या तोंडून दीपिकासाठी ‘भाभी’ ऐकून रणवीर जोरजोरात हसताना दिसला होता. तर दीपिका काहीसी लाजताना दिसली होती. पण यापुढे मीडियाच्या तोंडून तरी ‘भाभी’ असे ऐकण्याची दीपिकाची अजिबात इच्छा नाही.
गत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केले. लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दीपवीर दोघांनीही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या सुरक्षेवर सुमारे १ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता.