Watch Video : दिशा पाटनीने अशा हटके अंदाजात मानले चाहत्यांचे आभार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 03:57 PM2017-06-13T15:57:43+5:302017-06-13T21:44:33+5:30

नेहमीच अभिनेता टायगर श्रॉफ याच्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री दिशा पाटनी आज तिच्या वाढदिवसामुळे चर्चेत आली आहे.

Watch Video: Direction Patni, thanks to the fate of the celebrities! | Watch Video : दिशा पाटनीने अशा हटके अंदाजात मानले चाहत्यांचे आभार!

Watch Video : दिशा पाटनीने अशा हटके अंदाजात मानले चाहत्यांचे आभार!

googlenewsNext
हमीच अभिनेता टायगर श्रॉफ याच्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री दिशा पाटनी आज तिच्या वाढदिवसामुळे चर्चेत आली आहे. होय, बॉलिवूडच्या या क्यूट गर्लने तिचा २४ वा वाढदिवस साजरा केला आहे. ज्याकरिता दिशावर जगभरातील कानाकोपºयातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. सोशल मीडियावर तर तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या अंदाजात आपल्या आवडत्या अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या. चाहत्यांचे हे प्रेम बघून दिशाही भारावून गेली असून, तिने अतिशय हटके पद्धतीने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

होय, दिशा पाटनीने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यामध्ये ती तिच्या चाहत्यांचे खास अंदाजात आभार मानताना दिसत आहे. दिशा या व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, ‘माझ्या सर्व चाहत्यांना नमस्कार. मी आता ट्रिपवरून परतली असून, मी तुम्हा लोकांचे सर्व मेसेजेस आणि व्हिडीओज् बघितले आहेत. तुमच्या या प्रेमासाठी अन् आजचा दिवस स्पेशल करण्यासाठी तुम्हा सर्वाचे आभार. मी खूपच नशीबवान आहे की, माझ्याकडे तुमच्यासारखे फॅन्स आहेत. माझ्या सर्व फॅन्स क्लबसाठी मनापासून आभार.’
 

गेल्या काही दिवसांपासून टायगर आणि दिशा यांचे नाव सातत्याने एकमेकांशी जोडले जात आहे. माध्यमांमध्ये तर या दोघांच्या लिकअपच्या चर्चा जोरदार चर्चिल्या जातात. परंतु अद्यापपर्यंत या दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिलेली नाही; मात्र जेव्हा केव्हा या दोघांचे फोटो समोर आले तेव्हा हे दोघे संबंधात असावे असा समज झाल्याशिवाय राहत नाही. आगामी काळात हे दोघे ‘बागी-२’मध्ये झळकणार असून, लवकरच ते या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. शूटिंगदरम्यान हे दोघे एकमेकांसोबत कसे वावरतील हे बघणे मजेशीर ठरणार आहे. 

दरम्यान ‘बागी-२’ हा एक अ‍ॅक्शन चित्रपट असून, यामध्ये टायगरचा धमाकेदार अंदाज बघावयास मिळणार आहे. या व्यतिरिक्त टायगर करण जोहर याच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत ‘स्टुडंट आॅफ द इअर-२’ या चित्रपटातही झळकणार आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘मुन्ना मायकल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Web Title: Watch Video: Direction Patni, thanks to the fate of the celebrities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.