​ दिशा पटानीचा हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2017 10:17 AM2017-03-01T10:17:32+5:302017-03-01T16:05:31+5:30

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानी हिने तिच्या एका व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Watch this video of Patani! | ​ दिशा पटानीचा हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा!

​ दिशा पटानीचा हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा!

googlenewsNext
लिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानी हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.  बॉलिवूडमधील नव्या हिरोईनच्या तुलनेत मी तसूभरही कमी नाही, हेच जणू दिशाने दाखवून दिले. दिशाचा बॉयफ्रेन्ड(?)टायगरचे स्टंट्स आणि डान्स मुव्ह तुम्ही पाहिले आहेच. पण दिशा सुद्धा मागे नाही. तिचा एक व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला याची खात्री पटेल.दिशाने या आधी सुद्धा तिने अनेक व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पण यावेळी तिच्या एका व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओत दिशा एड शीर्णच्या ‘शेप आॅफ यू’वर डान्स ट्रेनरसोबत प्रॅक्टिस करताना दिसतेय. या व्हिडिओतील दिशाचे डान्सिंग मुव्ह एकदम भन्नाट आहेत, हे आम्ही सांगून तुम्हाला पटणार नाहीच. त्यासाठी तुम्हाला तिचा हा व्हिडिओच पाहावा लागेल.



दिशा सर्वप्रथम ‘एमएस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’मध्ये दिसली होती. यानंतर ती ‘कुंग फू योगा’मध्ये दिसली. पहिल्या चित्रपटात दिशा सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली तर दुसºया चित्रपटात सोनू सूद व हॉलिवूड अ‍ॅक्शन स्टार जॅकी चॅन यांच्यासोबत तिला संधी मिळाली. अलीकडे फिल्मफेअर अवार्डमुळे दिशा चर्चेत होती. या इव्हेंटमध्ये ती ओपन ड्रेस घालून पोहोचली होती. यानंतर सोशल मीडियावर तिला नाही नाही ते ऐकावे लागले. अर्थात दिशानेही याला तशाच शब्दांत उत्तर दिले.  कुठल्याही महिलेला तिच्या कपड्यांवरून जज करणे सोपे आहे. पण ही घाणेरडी मानसिकता मान्य करण्याची हिंमत अनेकांत नाही.  मला तुम्ही माझ्या बॉडीचा जो पार्ट कवर करायला सांगत आहात, आधी तुम्ही त्याकडे पाहणे बंद करा, अशा शब्दांत दिशाने तिच्यावर अश्लिल कमेंट करणाºयांना फटकारले होते.

Web Title: Watch this video of Patani!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.