Watch Video : शिल्पा शेट्टीला वियानने म्हटले ‘सिली मम्मा’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2017 09:23 AM2017-04-23T09:23:39+5:302017-04-23T14:55:25+5:30

​अभिनेत्री शिल्पा शेट्टी जरी चित्रपटांमधून गायब असली तरी, ती तिच्या परिवारासोबत नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट होत असते.

Watch Video: Shilpa Shetty tells Vineen to 'Silly Mamma' | Watch Video : शिल्पा शेट्टीला वियानने म्हटले ‘सिली मम्मा’

Watch Video : शिल्पा शेट्टीला वियानने म्हटले ‘सिली मम्मा’

googlenewsNext
िनेत्री शिल्पा शेट्टी जरी चित्रपटांमधून गायब असली तरी, ती तिच्या परिवारासोबत नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट होत असते. पती आणि मुलांसोबतचे काही आनंदाचे क्षण ती तिच्या फॅन्सबरोबर नेहमीच शेअर करताना दिसते. शिल्पाने असाच काहीसा मुलगा वियानबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यामध्ये वियान मम्मा शिल्पाला असे काही म्हणताना दिसत आहे की, शिल्पाबरोबर तिच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनाही हसू आवरणे मुश्किल होत आहे.

वास्तविक हा व्हिडिओ कुठल्यातरी मॉलमधील असल्याचे दिसत आहे. या मॉलमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या पोस्टरला बघून वियान सांगत आहे की, ही एक फेमस अ‍ॅक्टर असून, माझी फेव्हरेट आहे. वियान त्याच्या धुनमध्येच दीपिकाच्या पोस्टरचे कौतुक करत असतो, तेवढ्यात शिल्पा त्याच्याजवळ येत त्याला थांबविण्याचा प्रयत्न करते. मात्र यावर वियान शिल्पाला जे म्हणतो ते ऐकून तिच्यासह आजूबाजूला असलेल्या लोकांना हसू आवरणे मुश्किल होते. 

वियान शिल्पाला ‘शिली मम्मा’ असे म्हणतो. वियानचे हे शब्द जेवढे धक्कादायक वाटतात तेवढेच क्युटही वाटतात. पुढे वियान मम्मा शिल्पाचा हात धरून पुढे निघून जातो. मात्र वियानचे हे शब्द खूप हसविणारे आहेत. शिवाय वियान किती बोलका आहे हेही यावरून स्पष्ट होते. 

शिल्पाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या फॅन्सनी त्यास प्रचंड लाइक्स आणि कमेण्ट दिल्या. व्हिडिओमधील वियानचा खोडकरपणा सगळ्यांनाच भावत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या चेहºयावर हसू फुलल्याशिवाय राहणार नाही. शिल्पाबरोबरच राज कुद्रा यानेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. 


 

Web Title: Watch Video: Shilpa Shetty tells Vineen to 'Silly Mamma'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.