watch video : सनी म्हणते,‘कोई धंधा छोटा नहीं होता’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2017 02:59 PM2017-01-16T14:59:18+5:302017-01-16T14:59:18+5:30
raees sunny leone dubsmashes shah rukh khans iconic dialogue : सध्या सनी लिओनीचा एक डबस्मॅश व्हिडिओ व्हायरल झालाय. तोही चक्क बॉलिवूड बादशहा शाहरूख खान याच्या आवाजातला. होय, इन्स्टाग्रामवर सनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात सनी ‘रईस’ चित्रपटातील शाहरूखचा डायलॉग म्हणताना दिसतेय.
‘ ॉर्न गर्ल’ ही ओळख पुसून काढत सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख निर्माण केली आहे. सध्या तिचा एक डबस्मॅश व्हिडिओ व्हायरल झालाय. तोही चक्क बॉलिवूड बादशहा शाहरूख खान याच्या आवाजातला. होय, इन्स्टाग्रामवर सनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात सनी ‘रईस’ चित्रपटातील शाहरूखचा डायलॉग म्हणताना दिसतेय. ‘कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता’, असे अगदी किंगखानच्या थाटात सनी यात म्हणतेय. शाहरुखच्या अंदाजात त्याच्याच चित्रपटाचा डायलॉग बोलताना सनी अगदी स्टाईलिश दिसतेय. काल सनीने हा डबस्मॅश व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकला आणि आतापर्यंत दोन लाखांपेक्षाही अधिक लोकांनी तो पाहिला.
‘रईस’ चित्रपटात सनी लिओनीने ‘लैला ओ लैला’ या रिमेक गाण्यावर डान्स केला आहे. हे गाणे सध्या चांगलेच लोकप्रीय झाले आहे. सनी लिओनवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे यु-ट्युबवरचा सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडीओ ठरला आहे. याआधीही सनी लिओनीने काही डबस्मॅश व्हिडिओ शेअर केले आहेत. गेल्यावर्षी सनीने पती डॅनियल आणि मित्र युसूफ इब्राहिम यांच्यासोबतही डबस्मॅश व्हिडिओ केला होता. सनीच्या आधी सलमान खानने देखील ‘रईस’चा डायलॉग शेअर केला होता. सलमान ‘रईस’ डायलॉग बोलू लागतो आणि अचानक शब्दच विसरतो. तेव्हा या व्हिडिओत शाहरुखची एण्ट्री होते, असा हा व्हिडिओ होता. ‘रईस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
शाहरुख खानच्या या रईसमध्ये शाहरुख सोबत पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, अतुल कुळकर्णी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.