‘या’ वेब सीरिजचा बजेट चित्रपटांपेक्षाही मोठा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 01:50 PM2019-03-15T13:50:38+5:302019-03-15T14:01:25+5:30
या गोष्टीला आपण नकार देऊ शकत नाही की, डिजिटल शोजने संपूर्ण जगभरात मनोरंजनाचा चेहराच बदलून टाकला आहे. प्रेक्षक सध्या टीव्ही आणि थिएटर सोडून वेब सीरिज पाहू लागले आहेत. याचे कारणही तसेच आहे. वेगवेगळ्या धाटणीचे आशय या वेब सीरिजच्या माध्यमातून पे्रक्षकांना बघावयास मिळत आहेत. वेब सीरिजकडे प्रेक्षकांचा वाढता कल पाहता प्रोडक्शन हाउसेसने दिग्गज स्टार्सना लॉन्च करण्याचे आहे. साहजिकच अशा वेब सीरिजचे प्रोडक्शन आणि प्रमोशनसाठी तर खर्च वाढणारच. अशा काही वेब सीरिज आहेत ज्यांचा बजेट चित्रपटांपेक्षाही मोठा आहे. जाणून घेऊया त्या वेब सीरिज बाबत...
-रवींद्र मोरे

* द एंड
अक्षय कुमार ‘द एंड’ या आपल्या पहिल्या वेब सीरिजसोबत डिजिटल एंटरटेनमेंटच्या जगतात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. या वेब सीरिजचे मेकर्स बॉलिवूडचा सर्वात जास्त कमाई करणारा अॅक्टरला कास्ट करण्यास घाबरले नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार या वेब सीरिजसाठी अक्षय कुमारला सुमारे ९० कोटी रुपये मिळत आहेत. हा बजेट एखाद्या चित्रपटाच्या बजेटपेक्षा कमी नाही.
* सेक्रेड गेम्स
डिजिटल प्लेटफार्म वर सर्वात मोठे यश मिळवणारी भारतीय वेब सीरिज सेक्रेड गेम्सला फक्त मोठेच रिव्ह्यू मिळाले नाही तर देश विदेशातील प्रेक्षकही याचे मोठे फॅन झाले. फॅँटम द्वारा प्रोड्यूस या आठ एपिसोडच्या वेब सीरिजला सुमारे २५ ते ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनविण्यात आले होते. विशेषत: या वेब सीरिजच्या यशानंतर आता ‘सेके्रड गेम्स 2’ देखील येणार असल्याच्या चर्चा ऐकिवात आहेत. साहजिकच याचाही बजेट मोठाच असेल.
* इनसाइड एज
या वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऋचा चड्ढाने सोबत काम केले होते. क्रिकेटच्या बॅकड्रॉपवर आधारित बनलेल्या या सीरिजच्या एका एपिसोडचा बजेट २ कोटी एवढा होता. या व्यतिरिक्त प्रमोशन आणि मार्केटिंगचा खर्च वेगळा आला होता. एकंदरीत याच्या प्रोडक्शन हाऊसने या सीरिजवर ४० ते ५० कोटी खर्च केला होता.
* ब्रीथ
आर माधवन आणि अमित साध स्टारर या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मात्र तरीही या शोच्या प्रमोशनसाठी खूपच पैसा खर्च करण्यात आला होता. या वेब सीरिजचे प्रमोशन सरळ एका रिअॅलिटी शोसोबत क्लॅश करत होता, ज्यात पुढे येण्यासाठी प्रोडक्शनने २० कोटी एक्स्ट्रा खर्च मार्केटिंग आणि प्रमोशनवर केला होता.
* विशेष उल्लेख : मेहरुन्निसा
मेहरुन्निसा यांच्या आयुष्यावर आधारित हा शो बनण्यासाठी सज्ज होता, यासाठी एकता कपूरने सुमारे २५ कोटीचा बजेटही आखला होता. मात्र काही कारणास्तव एकताने हा प्रोजेक्ट बंद केला. हा प्रोजेक्ट का बंद केला आणि त्यांनतर त्याचे काय झाले याबाबत मात्र आजही अधिकृत कोणाला माहित नाही.