विक्रम भट करणार वेब सिरीजचे दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 07:37 PM2017-01-06T19:37:07+5:302017-01-06T19:37:07+5:30
बॉलिवूडमधील ख्यातनाम दिग्दर्शक विक्रम भट्ट याने विविध प्रकारच्या चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता त्याने एक नवा प्रयोग करण्याचे ...
ब लिवूडमधील ख्यातनाम दिग्दर्शक विक्रम भट्ट याने विविध प्रकारच्या चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता त्याने एक नवा प्रयोग करण्याचे ठरविले असून तो लवकरच दोन वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहे. आपल्या खास शैलीचा वापर विक्रम करणार असून या वेब सिरीजमुळे रोमांस, ड्रामा व सुपर नॅचरल या मालिका पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना काही तरी नवे देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विक्रम भट्ट यांनी रोमांस, भयपट, थ्रिलर यासह चित्रपटांच्या बहुतेक सर्वच प्रकारात आपला हात अजमावला आहे. यामाध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात तो यशस्वी ठरले आहेत. आता डिजीटल माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. नुकतीच विक्रम भट्ट याने आपण दोन वेब सिरीज दिग्दर्शित करणार आहोत अशी घोषणा केली.
व्हीयूक्लिप व्हिडीओची स्ट्रीमिंग सेवा ‘व्हीयू’च्या लाँचिंग प्रसंगी विक्रम भट याने ही माहिती दिली. या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात विक्रम भट्ट दिग्दर्शित वेब सिरीजचे प्रसारण सुरू होणार आहे. या वेब सिरीजची निर्मिती विक्रम भट्ट यांचे प्रोडक्शन हाऊस व डिजीटल मीडिया कंपनी कल्चर मशीन संयुक्तपणे करणार आहेत. विक्रम भट्ट दिग्दर्शित करीत असलेल्या वेब सिरीजमध्ये अलौकिक घटनाक्रमांचे शहरी थ्रिलर आहे. यात शहरात घडणाºया घटनांवर आधारित कथा आहेत. तर दुसरी वेब सिरीज बॉलिवूडमध्ये आज राज्य करीत असलेल्या कलावंताच्या संघर्षावर आधारित असेल. यापैकी एका शोमधील चित्रीकरण नाविण्यपूर्ण पद्धतीने करण्यात येणार आहे.
विक्रम भट्ट म्हणाला, मी डिजीटल माध्यमावर प्रेक्षकांसाठी नवे प्रोजेक्ट सादर करण्यासाठी उत्साहित आहे. डिजीटल माध्यमावर चाहत्यांना नव्या गोष्टी दाखविल्या जात आहेत. माझ्या या वेब सिरीजचे मुख्य ध्येय प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करण्याचे आहे. मला वाटते माझे दोन्ही शो चाहत्यांच्या पसंतीला उतरतील. या शोच्या प्रदर्शनाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही सांगितले. विक्रम भट्ट चाहत्यांना नव्या माध्यमातून मनोरंजन करण्यात किती यशस्वी होईल हे लवकरच कळेल, मात्र चाहत्यांसाठी मनोरंजनाची ही नवी ट्रिट असेल यात शंका नाही.