मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर बनणार वेब सिरीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 04:54 PM2018-08-06T16:54:22+5:302018-08-06T17:02:38+5:30
अनिल डी. अंबानी यांच्या मालकीच्या ‘रिलायन्स एंटरटेन्मेंट’ची फँटम फिल्म्स आणि नामवंत युवा दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी सर्वाधिक ‘लक्ष्य’ असलेले ...
अनिल डी. अंबानी यांच्या मालकीच्या ‘रिलायन्स एंटरटेन्मेंट’ची फँटम फिल्म्स आणि नामवंत युवा दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी सर्वाधिक ‘लक्ष्य’ असलेले टॉप कॉप आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर व केस फाईल्सवर मूळ वेब सिरीज तयार करण्यासाठी करार केला आहे. ही मालिका श्री. मारिया यांचे अनुभव आणि त्यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत हाताळलेल्या विविध प्रकरणांचे पुरावे (केस फाईल्स) यावर आधारित असून वेब सिरीजचे नाव आणि टीव्ही वरील प्रसारणाची वेळ गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांनी १९८१च्या तुकडीमधून नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. १९९३ मध्ये पोलीस उपायुक्त (वाहतूक) या पदावर काम करताना त्यांनी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा छडा लावला आणि पुढे मुंबई पोलीस दलात ते पोलीस उपायुक्त (गुन्हे) आणि पोलीस सह-आयुक्त (गुन्हे) म्हणून रुजू झाले. मारिया यांनी २००३ मधील गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा उलगडा केला. २००८ मध्ये मुंबईतील कुप्रसिद्ध २६/११ हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी मारिया यांच्याकडे सोपवण्यात आली आणि या प्रकरणातील एकमेव जिवंत दहशवादी अजमल कसाब याची उलटतपासणी व जबानी घेण्याचे तसेच या खटल्याचे यशस्वी अन्वेषण करण्याचे काम मारिया यांनी केले.
या संदर्भात बोलताना राकेश मारिया म्हणाले, “आयुष्याच्या त्या प्रवासाचा पुनःप्रत्यय घेणे ही खूप आनंदाची बाब आहे. विशेषतः जेव्हा मेघना गुलजार यांच्यासारखी बुद्धिमान व संवेदनशील दिग्दर्शिका आणि ‘रिलायन्स एंटरटेन्मेंट’च्या ‘फँटम फिल्म्स’ या गुणवान प्रॉडक्शन हाऊसकडे या सगळ्याचे सहभाग असल्यावर हे माझ्यासाठी खूप एक्सायटेड आहे.
मेघना यांच्या 'तलवार' या २०१५ मध्ये आलेल्या चित्रपटाने परीक्षणाची जबरदस्त लाट निर्माण केली आणि प्रेक्षकांकडून त्याला कौतुकाचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ त्यांचा नुकताच मे २०१८ मध्ये आलेला चित्रपट म्हणजे 'राझी'. या चित्रपटाने देखील समीक्षकांची वाहवा मिळवली. शिवाय बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करत मोठे व्यावसायिक यश देखील संपादित केले.
या घोषणेबद्दल बोलताना मेघना गुलजार म्हणाल्या, “श्री. राकेश मारिया यांच्या जीवनातील अनुभव आणि कायद्याची अंमलबजावणी व रक्षण करण्याची त्यांची पोलीस दलातील कारकीर्द हे आपला समाज, शहर, देश तसेच भौगोलिक प्रांत यामधील गुन्हेगारी आणि दहशतवादाचा कालक्रम उलगडण्यासाठीची उत्कृष्ट दूरक्षेप आहेत. या सहयोगाबाबत बोलताना ‘फँटम फिल्म्स’च्या मधु मंटेना म्हणाल्या, “फँटम फिल्म्स ही कायमच दिग्दर्शकाची कंपनी म्हणून काम करत आली आहे. श्री. राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर वेब सिरीज बनविण्यासाठी मेघनाबरोबर सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद आणि उत्साह वाटतो आहे.''