'लापता लेडीज' मधील भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने दिली होती ऑडिशन, टॉप 2 पर्यंत गेली पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:02 PM2024-07-20T15:02:39+5:302024-07-20T15:03:32+5:30

वेब सीरिजमध्ये दिसणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने 'लापता लेडीज' साठी ऑडिशन दिली होती.

webseries actress Ahasaas Channa was audiotioned for jaya s role in Laapata Ladies | 'लापता लेडीज' मधील भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने दिली होती ऑडिशन, टॉप 2 पर्यंत गेली पण...

'लापता लेडीज' मधील भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने दिली होती ऑडिशन, टॉप 2 पर्यंत गेली पण...

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) यावर्षीचा सर्वात लोकप्रिय सिनेमा ठरला. सरळ साधी लव्हस्टोरी, अप्रतिम अभिनय यामुळे सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. सिनेमातील मुख्य स्टारकास्टही नवीन होती. केवळ अभिनेते रवी किशन हा ओळखीचा चेहरा होता. तरी सिनेमाचं कथानक, अभिनय, गाणी यामुळे खूप कौतुक झालं. पण तुम्हाला माहितीये का वेब सीरिजमध्ये दिसणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने 'लापता लेडीज' साठी ऑडिशन दिली होती.

'कोटा फॅक्टरी', 'हॉस्टेल डेज', 'हाफ सीए' सारख्या वेबसीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री एहसास चन्ना (Ahsaas Channa). तिने बालकलाकार म्हणून काही सिनेमांमधून करिअरला सुरुवात केली. आज ती वेब विश्वात लोकप्रिय आहे. 'लापता लेडीज' बाबत ती म्हणाली, "मी नुकताच लापता लेडीज पाहिला. मी या सिनेमासाठी ऑडिशनही दिली होती. मी किरण राव आणि आमिर खानला भेटले होते. टॉप 2 पर्यंत पोहोचले. पण नंतर रिजेक्ट झाले. पण सिनेमा खरंच खूप सुंदर आहे. मी जया या भूमिकेसाठी  ऑडिशन दिली होती."

ती पुढे म्हणाली, "प्रतिभाने सिनेमात खूप छान काम केलं आहे. किरण रावसोबत काम करण्याची संधी मला मिळणारच होती. पण परत मला अशी काही संधी मिळो अशी इच्छा आहे. चैतन्य ताम्हणेसोबतही मला काम करायचंय. तो कमाल दिग्दर्शक आहे. अशी माझी मोठी आणि न संपणारी यादी आहे.

एहसास चन्ना लवकरच 'मिसमॅच्ड सिझन 3' मध्ये दिसणार आहे. यात तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तिची नुकतीच रिलीज झालेली कोटा फॅक्टरी सीरिजही गाजत आहे. 

Web Title: webseries actress Ahasaas Channa was audiotioned for jaya s role in Laapata Ladies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.