लग्नाच्या आधी अनिल कपूरने रणवीरबद्दल दीपिकाला दिला होता हा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 16:21 IST2018-12-04T16:21:14+5:302018-12-04T16:21:59+5:30
रणवीर सिंग व दीपिका पादुकोण या दोघांच्या नात्याबद्दल अभिनेता अनिल कपूरने खुलासा केला आहे.

लग्नाच्या आधी अनिल कपूरने रणवीरबद्दल दीपिकाला दिला होता हा सल्ला
रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांचे लग्न बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ते दोघे गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर ते विवाहबंधनात अडकले. त्या दोघांचे लग्न इटलीमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. मात्र या दोघांच्या नात्याबद्दल अभिनेता अनिल कपूरने खुलासा केला आहे.
नेहा धुपियाच्या शोमध्ये अनिल कपूरने हजेरी लावली होती. त्यावेळी अनिल कपूरने सांगितले की, 'दीपिका आणि रणवीर दोघेही खूप छान आहेत. मला आठवते आहे दिल धडकने दो चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका सेटवर आली होती.'
ते पुढे म्हणाले की, 'तेव्हा आम्ही शिपवर एक सीन करायला जात होतो. त्यावेळी मी तिला म्हणालो की, 'ह्याला सोडू नकोस, हा मुलगा सुपर्ब आहे, खूप चांगली निवड आहे. यापेक्षा चांगला मुलगा तुला मिळणार नाही.'
अनिल कपूर व रणवीर सिंग एकमेकांच्या जास्त जवळ आहे. नुकतेच दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनमध्ये अनिल कपूरने हजेरी लावली होती. आधी अशी बातमी आली होती की अनिल कपूर रणवीरवर नाराज आहेत. कारण इटलीतील लग्नाचे आमंत्रण मिळाले नाही. मात्र या सर्व वृत्त खोटे असल्याचे सांगत अनिल कपूर यांनी दीपवीरला शुभेच्छा दिल्या.
अनिल कपूर व रणवीर सिंग लवकरच करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटात दिसणार आहे. पुन्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंगचा सिम्बाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर अॅक्शन करताना दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत.