'वेलकम' फेम अभिनेत्याने व्यक्त केलं दु:ख, म्हणाले, "अक्षयच्या स्टाफपेक्षाही कमी मानधन मिळालं"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 12:30 PM2024-01-09T12:30:48+5:302024-01-09T12:31:13+5:30

दुबईत मला जे हॉटेल मिळालं होतं तिथेच अक्षय कुमारचा स्टाफ राहत होता.

welcome actor Mushtaq Khan reveals he got less fee than Akshay Kumar staff | 'वेलकम' फेम अभिनेत्याने व्यक्त केलं दु:ख, म्हणाले, "अक्षयच्या स्टाफपेक्षाही कमी मानधन मिळालं"

'वेलकम' फेम अभिनेत्याने व्यक्त केलं दु:ख, म्हणाले, "अक्षयच्या स्टाफपेक्षाही कमी मानधन मिळालं"

अक्षय कुमार, कतरिना कैफ, नाना पाटेकर, परेश रावल आणि अनिल कपूर यांचा सुपरहिट सिनेमा 'वेलकम' (Welcome) ला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. यातील प्रत्येक पात्रानेच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सिनेमात अभिनेते मुश्ताक खानही (Mushtaq Khan) मजेशीर भूमिकेत होते. त्याचा एक पाय तुटलेला असतो आणि तो प्रत्येक वेळी सांगत असतो की कसं उदय भाई(नाना पाटेकर)ने माझा पाय तोडला आणि मगा रुग्णालयात घेऊन गेले. नुकतंच अभिनेता मुश्ताक यांनी सिनेमाबाबतीत एक खुलासा केला आहे.

मुश्ताक यांनी व्यक्त केलं दु:ख

एका पॉडकास्टमध्ये अभिनेते मुश्ताक यांनी आश्चर्यकारक खुलासे केले. ते म्हणाले, "वेलकम सिनेमासाठी मला अक्षय कुमारच्या स्टाफपेक्षाही कमी मानधन मिळालं असेल. दुर्भाग्याने आपल्या सिनेमांमध्ये स्टार्सवर खूप पैसे खर्च केले जातात. आम्ही प्रत्येक ठिकाणी स्वत:च जातो. आम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करतो आणि मेकर्स सांगतील त्याच हॉटेलमध्ये राहतो. दुबईत मला जे हॉटेल मिळालं होतं तिथेच अक्षय कुमारचा स्टाफ राहत होता. मोठ्या सिनेमांमध्ये हे असं घडतंच."

ते पुढे म्हणाले,'पण आता काळ बदलतोय. अनेक कलाकार ही तफावत कमी करु इच्छित आहेत. मी स्त्री 2 मध्ये आता काम करत आहे. इथे मला खूप प्रेम आणि आदर मिळतो. सगळे एकमेकांची काळजी घेतात. आम्ही सोबत मस्ती करतो. मी नुकतंच रेलवे मैनमध्ये काम केलं होतं त्यातही मजा आली. प्रोडक्शनच्या लोकांनी आदर दिला. प्रोडक्शनच्या लोकांची नवी पिढी आणि नवीन कलाकार खूप चांगलं करत आहेत."

Web Title: welcome actor Mushtaq Khan reveals he got less fee than Akshay Kumar staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.