CoronaVaccination: बनावट लसीकरणाचा साइड इफेक्ट, TMC खासदार मिमी चक्रवर्तींची प्रकृती बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 05:10 PM2021-06-26T17:10:08+5:302021-06-26T17:14:26+5:30

मिमी यांनी ट्विट करत, लस घेतल्याने आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही, असे म्हटले होते. मात्र, लस घेतल्यानंतर 4 दिवसांनी त्या आजारी पडल्या आहेत. 

West Bengal Actress mimi chakraborty ill after taking jab at fake covid 19 vaccine camp | CoronaVaccination: बनावट लसीकरणाचा साइड इफेक्ट, TMC खासदार मिमी चक्रवर्तींची प्रकृती बिघडली

CoronaVaccination: बनावट लसीकरणाचा साइड इफेक्ट, TMC खासदार मिमी चक्रवर्तींची प्रकृती बिघडली

googlenewsNext

कोलकाता - पश्चिम बंगालमधील टीएमसी खासदार अॅक्ट्रेस मिमी चक्रवर्ती गंभीर आजारी पडल्या आहेत. त्यांनी नुकताच बनावट लसीकरण केंद्रावरून लशीचा पहिला डोस घेतला होता. यापूर्वी, मिमी यांनी ट्विट करत, लस घेतल्याने आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही, असे म्हटले होते. मात्र, लस घेतल्यानंतर 4 दिवसांनी त्या आजारी पडल्या आहेत. (West Bengal Actress mimi chakraborty ill after taking jab at fake covid 19 vaccine camp)

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मिमी चक्रवर्ती गंभीर आजारी पडल्या आहेत. त्यांनी नुकता अपल्यासोबत धोका झाल्याचा खुलासा केला होता. त्यांनी कोलकात्यात कॅम्पेन करणाऱ्या एका व्यक्तीची पोलखोल केली होती. देबांजन देव, असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 

Good news : डेल्टा+पासून सुरक्षिततेसाठी लशींचे मिश्रन एक ऑप्शन, पण...; AIIMSच्या संचालकांनी सांगितला मोठा पर्याय

मिमींनी केला होता भांडाफोड - 
यासंदर्भात एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना मिमी यांनी सांगितले होते, की "एका लसीकरण शिबिरासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सांगण्यात आले होते की, कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जॉईंट कमिश्नरच्यावतीने ट्रान्सजेंडर आणि अपंगांसाठी मोफत लसीकरण शिबीर (Corona Vaccine) आयोजित करण्यात आले आहे. आयएएस अधिकारी असल्याचे सांगून त्या व्यक्तीने मला कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यानंतर मी तेथे गेले आणि लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी लस घेतली."

"कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर जेव्हा मला कोणताही मेसेज आला नाही, तेव्हा मी लसीकरण प्रमाणपत्राबाबत विचारलं. तीन-चार दिवसांत ते मिळेल असे त्यावेळी मला सांगण्यात आले. तेव्हा मला थोडी शंका आली, यानंतर मी लसीकरण थांबवले आणि पोलिसांनादेखील याबाबत सूचना दिली" असे मिमी चक्रवर्ती यांनी म्हटले होते. 

Web Title: West Bengal Actress mimi chakraborty ill after taking jab at fake covid 19 vaccine camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.