बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सैफ अली खानने साराला दिला होता लाखमोलाचा सल्ला, तरीही घेतले नाही गांभिर्याने?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:34 AM2020-10-20T11:34:12+5:302020-10-20T11:39:30+5:30
'केदारनाथ' सिनेमामध्ये सुशांतसिंग राजपूतसोबत पदार्पणानंतर साराने सिंबामध्ये काम केले. साराचे दोन चित्रपट एकाच वर्षी रिलीज झाले. सारा आता इम्तियाज अलीच्या रोमँटिक चित्रपट आणि 'कुली नंबर 1' मध्ये दिसणार आहे.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. साराचे पदार्पण यशस्वी झाले ठरले. तिने सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्रीचे अनेक पुरस्कारही मिळवले आहेत. सारा अली खानचा पहिला चित्रपट 'केदारनाथ' आहे. पण इंडस्ट्रीत येण्यापूर्वी वडील सैफ अली खानने साराला काय सल्ला दिला होता हे तुम्हाला माहिती आहे काय?
सैफ अली खानने एका मुलाखतीत याचा खुलासा केलाय. सैफने साराला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. तसेच आमिर खानसारख्या
कलाकारांचे निरिक्षण करा, त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकता येतील अशा कलाकारांच्या सहवासात राहा. त्यातून शिका आणि स्वतःचे नियम स्वतः ठरवा त्यानुसार काम करायला शिकणे गरजेचे आहे. तरच या इंडस्ट्रीत टीकाव लागू शकतो.
अल्पावधीत साराने ज्या प्रकारे ब़लिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. लोकप्रियता मिळविली आहे, असे दिसते आहे की तिने वडिलांच्या शब्दांना गांभीर्याने घेतले आहे. 'केदारनाथ' सिनेमात सुशांतसिंग राजपूतसोबत पदार्पणानंतर साराने सिंबामध्ये काम केले. साराचे दोन चित्रपट एकाच वर्षी रिलीज झाले. सारा आता इम्तियाज अलीच्या रोमँटिक चित्रपट आणि 'कुली नंबर 1' मध्ये दिसणार आहे.
सारा अली खान चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चर्चेत आहे. सारा अली खान अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत आहे. लव्हबर्ड्स बर्याचदा एकत्र दिसतात. दोघेही इम्तियाज अलीच्या रोमँटिक चित्रपटात काम करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. सारा-कार्तिक एकत्र पडद्यावर बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.