बेडरूममध्ये कोणत्या गोष्टीवरून करीना कपूर आणि सैफ अली खानची होतात भांडणं?, स्वतःच अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:15 PM2024-10-03T13:15:46+5:302024-10-03T13:16:52+5:30

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

What causes Kareena Kapoor and Saif Ali Khan to fight in the bedroom?, revealed the actor himself | बेडरूममध्ये कोणत्या गोष्टीवरून करीना कपूर आणि सैफ अली खानची होतात भांडणं?, स्वतःच अभिनेत्याने केला खुलासा

बेडरूममध्ये कोणत्या गोष्टीवरून करीना कपूर आणि सैफ अली खानची होतात भांडणं?, स्वतःच अभिनेत्याने केला खुलासा

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. पण तुम्हाला माहिती आहे का, करीना आणि सैफमध्ये बेडरूममध्ये या एका गोष्टीवरून होतात भांडणं. नेटफ्लिक्सवरील शो ग्रेट इंडियन कपिल शोच्या मागील भागात देवरा सिनेमाच्या स्टारकास्टने हजेरी लावली होती. यावेळी सैफ अली खान, ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूरने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. त्यावेळी नवाब पटौदी म्हणजेच सैफ अली खानने खुलासा केला होता की, बेडरूममध्ये करीना आणि त्याच्यात कोणत्या गोष्टीवरून वाद होतात. 

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मागील भागात देवरा सिनेमातील कलाकारांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील खुलासे केले होते. त्यावेळी सैफ अली खानने शोमध्ये बेडरूम सीक्रेटही सांगितले. या शोमध्ये कपिल शर्माने सैफ अली खानला विचारले होते की, मियां बीवीमध्ये टीव्हीच्या रिमोटवरून भांडणं होतात असे ऐकले होते. पण तुझ्यात आणि करीनामध्ये एसीच्या रिमोटवरून वाद होतात. यावर अभिनेता म्हणाला की, भांडणं नाही पण तडजोड झाली आहे. सैफ अली खान म्हणाला की, त्याला गरमीत झोपायला आवडत नाही आणि करीनाला थोडे गरम वातावरणात झोपायला आवडते. पुढे सैफ अली खान म्हणाला की, मी बेडरूममध्ये १९ डिग्री टेंपरेचरवर तडजोड केली आहे. मी खूश आहे आणि कदाचित ती पण खूश आहे. १९ डिग्री माझ्यासाठी ठीक आहे पण १८ असते तर माझ्यासाठी ग्रेट असते.


यापूर्वी करीना कपूरने द वीकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, एसीच्या टेंपरेचरवरून तिच्यात आणि सैफमध्ये वाद होतात. बेबो म्हणाली होती की,  आम्ही एसीच्या टेंपरेचरवरून भांडणं करतो कारण सैफला १६ डिग्री हवे असते. त्याला नेहमीच गरम वाटत असते आणि मला २० टेंपरेचर हवे असते. मग ते म्हणतात की मला माहित आहे की, एसीच्या टेंपरेचरवरून लोकांचा घटस्फोट होतो. मात्र मग आम्ही १९वर तडजोड केली आहे, जे वाईट नाही.

या गोष्टीवरूनही होतात त्यांच्यात भांडणं

करीनाने हेदेखील सांगितले होते की, तिची सैफसोबत भांडणं एकमेकांना वेळ न देण्यावरून होतात. बिझी शेड्युलमुळे एकमेकांना जास्त वेळ देता येत नाही. ती म्हणाली होती की, ते पैसे किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीची तक्रार करतात तेव्हा भांडणांचं कारण एकमेकांना वेळ न देणे असते.

२०१२ साली सैफ आणि करीनाने केलं लग्न

सैफ आणि करीना कपूर यांचे २०१२ साली लग्न झाले होते. सैफने करिनासोबत दुसरे लग्न केले आहे, त्याआधी त्याचे लग्न अमृता सिंगसोबत झाले होते. ज्याच्यासोबत त्याला मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम ही दोन मुले आहेत. मात्र, काही वर्षांनी सैफ आणि अमृता सिंग यांचा घटस्फोट झाला. करीना आणि सैफला दोन मुले आहेत. मोठा मुलगा तैमूर आणि धाकटा मुलगा जेह. अभिनेत्री अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Web Title: What causes Kareena Kapoor and Saif Ali Khan to fight in the bedroom?, revealed the actor himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.