सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 09:47 AM2024-10-19T09:47:05+5:302024-10-19T10:41:41+5:30

सलीम खान यांनी मुलगा सलमान खान कधीही माफी मागणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे

What did Salim Khan say on the threats Salman Khan is receiving | सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."

सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."

Salim Khan on Salman Khan Death Threat : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकींच्या मृत्यूची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत जो कोणी सलमान खानच्या पाठीशी उभा असेल त्याला त्याच्या परिणामांची जाणीव असावी, असं म्हटलं आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या सलमान खानसोबत असलेल्या संबंधामुळे झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणावरुन आता सलनाम खानचे वडील सलमान खान यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. बुधवारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नावाने मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आला होता, ज्यामध्ये पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट असेल, अशी धमकीही देण्यात आली. या सर्व वादांमध्ये सलीम खान यांनी  मुलगा सलमान खान कधीही माफी मागणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

यावेळी सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली का सवाल सलीम खान यांनी केला. यावर सलीम खान यांनी याच्याशी सलमानचा संबंध नसल्याचे म्हटलं आहे. "मला वाटत नाही सलमान खानचा याच्याशी काही संबंध असेल. बाबा सिद्दींकींच्या हत्येसोबत त्याचा काय संबंध असणार आहे", असं सलीम खान यांनी म्हटलं आहे.

या मुलाखतीत सलीम खान यांनी सलमान खान माफी मागणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. "सलमानने कधीही प्राण्यांची शिकार केली नाही. सलमान खानला मिळणाऱ्या धमक्या केवळ खंडणीसाठी आहेत. सलमानने कधीही कोणत्याही प्राण्याची हत्या केली नाही. सलमानने कधी सामान्य झुरळाचीही हत्या केली नाही. आम्ही हिंसेवर विश्वास ठेवत नाही," असे सलीम खान यांनी स्पष्ट केलं. लोक मला म्हणतात की तुम्ही नेहमी जमिनीकडे बघता. तुम्ही खूप सभ्य आहात. मी त्यांना सांगतो की यात लाज वाटण्यासारखे काही नाही. मला भीती वाटते की काही कीटक माझ्या पायाखाली येऊन जखमी होतील. मी त्यांनाही वाचवत राहतो, असंही सलीम खान म्हणाले.

 

Web Title: What did Salim Khan say on the threats Salman Khan is receiving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.