दहा वर्षे बॉलिवूडमध्ये काम करूनही या अभिनेत्रीला घ्यावा लागला होता आध्यात्माचा सहारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:07 PM2020-04-25T17:07:21+5:302020-04-25T17:10:07+5:30
बुद्धिस्ट मेडिटेशन सेंटरमध्ये सरळ साध्या सोप्या श्वासोच्छवास तंत्राने खूप आराम मिळाल्याचे तिने या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगितलं होतं.
२००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने २००५ साली आशिक बनाया आपने सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या सिनेमाला आणि तनुश्रीच्या सिनेमातील परफॉर्मन्सला रसिकांची दाद मिळाली. यानंतर ती चॉकलेट, ढोल, रिस्क,स्पीड अशा विविध सिनेमातही झळकली.
मात्र पहिल्या सिनेमातील यशाप्रमाणे तनुश्रीला या सिनेमांमध्ये यश मिळालं नाही. हे सिनेमा सपशेल आपटले. त्यामुळे तनुश्री हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली. 2010 साली रूपेरी पडद्यावर झळकलेल्या अपार्टमेंट सिनेमात तनुश्रीचं रसिकांना अखेरचं दर्शन झालं होतं.
करियरमध्ये मिळणारं अपयश तनुश्रीला रूचलं नाही. ती निराश झाली आणि याच नैराश्यातून ती डिप्रेशनमध्ये कधी गेली हे तिचं तिला कळलं नाही. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने त्यावेळी आध्यात्माचा सहारा घेतला. या काळात तिने भारतातील विविध आध्यात्मिक आश्रमांमध्ये आश्रय घेतला. बराच काळ तिने कोईम्बतूर इथल्या जग्गी वासुदेव यांच्या आश्रमात घालवला. लडाख यात्रेदरम्यान तिने केशवपनही केलं. एका मुलाखतीमध्ये तिने आपला लडाखमधील अनुभवसुद्धा शेअर केला.
बुद्धिस्ट मेडिटेशन सेंटरमध्ये सरळ साध्या सोप्या श्वासोच्छवास तंत्राने खूप आराम मिळाल्याचे तिने या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगितलं होतं. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी खूप फायदेशीर ठरल्याचेही तिने नमूद केले आहे. यामुळे तिला नवं जीवन मिळाल्याची अनुभूती आली. यानंतंर दोन वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिथेसुद्धा तनुश्री आणि आध्यात्माचा संबंध कायम राहिला. सेलिब्रिटी असल्याने तिथल्या विविध कार्यक्रमात तिला पाहुणी, जज, परफॉर्मर म्हणून आमंत्रित केलं जातं.