सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर जे देशात घडले ते त्रासदायक - उज्ज्वल निकम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 16:10 IST2020-08-06T15:58:38+5:302020-08-06T16:10:23+5:30
सुशांतच्या वडिलांनी तक्रारी दाखल केल्यानंतर ज्या ज्या घटना देशात घडल्या, त्या त्रासदायक आहेत.

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर जे देशात घडले ते त्रासदायक - उज्ज्वल निकम
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर देशभरात ज्या घडामोडी घडल्या यावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. पंजाबी केसरीला दिलेल्या मुलाखती दरम्यान ते म्हणाले, “सुशांतच्या वडिलांनी तक्रारी दाखल केल्यानंतर ज्या ज्या घटना देशात घडल्या, त्या त्रासदायक आहेत. बिहार आणि मुंबईचे पोलिस ज्या पद्धतीने एकमेकांविरोधात विधानं केली, जे काही घडले ते अत्यंत वाईट आहे. पुढे जर मुंबई पोलीस बिहारमध्ये गेले तर बिहार पोलीसदेखील मुंबई पोलिसांना सहकार्य करणार नाही असे ही उज्ज्वल निकम या मुलाखती दरम्यान म्हणाले.
केंद्र सरकारने सीबीआय चौकशीला परवानगी दिल्यानंतर अचानक या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. ईडीने देखील रियाला चौकशीसाठी समन्स पाठवले असून तिचा सहकारी सॅम्युअलची ईडी चौकशी करत आहेत. सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे बिहार पोलिसांचे पथक रियाची चौकशी करू शकते.
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह ५ जणांविरोधात पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी आपल्या तक्रारीत आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले. रियाने पैशांसाठी सुशांतला फसवल्याचंही त्यांनी यात म्हटलं आहे. त्यामुळे सुशांत प्रकरण मनी लॉण्डरिंगशी संबंधित असल्यामुळे ईडीने गुन्हा दाखल केला आहे.