असे काय झाले की, सर्वांसमोर अनन्या पांडेवर चिडला कार्तिक आर्यन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 19:20 IST2019-09-01T19:20:10+5:302019-09-01T19:20:35+5:30
सध्या कार्तिक त्याचा आगमी सिनेमा ‘पति पत्नी और वो’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमाचं शूट सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे हे दोघेही सध्या लखनऊला पोहोचले आहेत.

असे काय झाले की, सर्वांसमोर अनन्या पांडेवर चिडला कार्तिक आर्यन?
अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्यातील नात्याची सर्वत्र चर्चा आहे. या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबूली दिली नसली तरी त्यांच्यातील खास बॉन्डिंग आपण पाहतो. सध्या कार्तिक त्याचा आगमी सिनेमा ‘पति पत्नी और वो’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमाचं शूट सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबतअनन्या पांडे स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे हे दोघेही सध्या लखनऊला पोहोचले आहेत. या ठिकाणच्या एका प्रसिद्ध टी स्टॉलला त्यांनी भेट दिली. यावेळी अनन्या असं काही वागली ज्यामुळे कार्तिक चक्क सर्वांसमोर तिच्यावर भडकला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि अनन्या एका टी स्टॉलवर उभे असलेले दिसत आहेत. यावेळी त्यांना कचोरी आणि चहा दिला जातो. चहा आणि कचोरी पाहिल्यावर कर्तिक खूश झालेला पाहायला मिळतो. तो अनन्याला चहा प्यायला सांगतो मात्र त्यावर ती मला चहापासून एलर्जी असल्याचं सांगताना दिसते. तिचं उत्तर ऐकून कार्तिक तिच्यावर काहीसा चिडलेला पाहायला मिळाला. तो तिला म्हणाला, एलर्जी आहे तर मग इथे आलीसच का? त्यावर अनन्या बोलते सो मीन.
कार्तिक आणि अनन्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावर अनेक गंमतीशीर कमेंट पाहायला मिळत आहेत. एक युजरनं लिहिलं, ताई, चहाची एलर्जी आहे तर मग या जगात का आलीस तू. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, चहाची एलर्जी टिपिकल साऊथ बॉम्बे ब्राट आहे. आमचा तर दिवसही सुरू नाही होत चहाशिवाय. कार्तिक आणि अनन्या पती पत्नी और वो या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत भूमि पेडणेकर सुद्धा दिसणार आहे.
सारा अली खानसोबत लिंकअपच्या चर्चा सुरू होण्याअगोदर कार्तिक आणि अनन्यामध्ये जवळीक वाढल्याचं बोललं जात होतं. एका मुलाखतीत अनन्यानंही कर्तिकला डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं. काही वेळा हे दोघं एकत्रही दिसले होते मात्र नंतर कार्तिकच्या आयुष्यात सारा आली आणि सध्या सारा आणि कार्तिक अनेक ठिकणी एकत्र दिसतात. शूटमधून वेळ काढून हे दोघं एकमेकांना भेटयला जातात. काही दिवसांपूर्वी कार्तिकच्या वडीलांना भेटायला सारा हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती.