असं काय घडलं की करीना कपूर अक्षय कुमारवर अनेकदा थुंकली, अभिनेत्याने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 17:14 IST2024-07-19T17:13:17+5:302024-07-19T17:14:57+5:30
Kareena Kapoor-Akshay Kumar : करीना कपूर आणि अक्षय कुमार यांनी अनेक दमदार चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

असं काय घडलं की करीना कपूर अक्षय कुमारवर अनेकदा थुंकली, अभिनेत्याने केला खुलासा
अक्षय कुमार (Akshay Kumar), करीना कपूर (Kareena Kapoor), दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा 'गुड न्यूज' (Good News) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात करीनाने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीनाने अक्षयसोबत असे काही केले की ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
खरंतर हा किस्सा अक्षय कुमार आणि करीना कपूर यांच्याशी संबंधित आहे. ज्याचा खुलासा अक्षयने केला होता. जेव्हा तो त्याच्या टीमसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. यावेळी कपिलने अक्षयला असा प्रश्न विचारला की, 'गुड न्यूज'च्या शूटिंगदरम्यान करीनाने त्याच्यावर इतक्या वेळा थुंकली होती की त्याला आपला मेकअप पुन्हा पुन्हा दुरुस्त करावा लागला.
कपिलच्या या प्रश्नावर अक्षय कुमार म्हणाला, 'हे अगदी खरे आहे. जेव्हा करीना डिलिव्हरी सीन शूट करत होती. त्यादरम्यान ती जोरजोरात ओरडत होती. पण हे करताना ती पुन्हा पुन्हा माझ्यावर थुंकतेय हे तिला कळले नाही..'
करीनाला आहे ही वाईट सवय
यावेळी अक्षय कुमारनेही करीनाच्या एका वाईट सवयीचा खुलासा केला होता. अभिनेत्याने सांगितले होते की ती आपली नखे खूप चावते. तेव्हा करीना म्हणाली की, माझी आई माझ्या नखांना मिरची पावडर लावायची जेणेकरून मी माझे नखे चावू नये. तरीही मी ही सवय सोडू शकले नाही..'
ऐतराजमध्येही झळकलेत अक्षय कुमार आणि करीना कपूर
या चित्रपटापूर्वी अक्षय कुमार आणि करीना कपूरने 'ऐतराज' चित्रपटात काम केले होते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर शेवटची 'क्रू' चित्रपटात दिसली होती. अक्षय कुमारचा नुकताच 'सरफिरा' चित्रपटात पाहायला मिळाला,