अवघ्या 16 व्या वर्षीच या अभिनेत्रीने गमावली होती व्हर्जिनीटी, त्यानंतर आयु्ष्यात असा झाला बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 12:17 PM2020-03-06T12:17:41+5:302020-03-06T13:25:47+5:30
'करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनी' यामध्ये तिच्या आयुष्याशी निगडीत अशाच खास गोष्टींचा उलगडा तिने केला आहे.
पॉर्न स्टार आणि बॉलीवुड अभिनेत्री सनी लिओनीचे कोट्यवधी चाहते आहेत. सोशल मीडियावरही सनीचे दीड कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. २ हजार ४५५ हून अधिक पोस्ट तिने शेअर केल्या आहेत. पॉर्नस्टार आणि बोल्ड तसंच हॉट अभिनेत्री सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.बोल्ड, आणि बिनधास्त असल्यामुळे इंटरनेटवरील मोस्ट सर्च सेलिब्रिटीही बनली आहे. ती जितकी बोल्ड तितकीच ती बिनधास्त आहे. वयाच्या 16 व्या वर्षीच तिने व्हर्जिनीटी गमावली होती.'करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनी' यामध्ये तिच्या आयुष्याशी निगडीत अशाच खास गोष्टींचा उलगडा तिने केला आहे.
यावर तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या जीवनात आजवर ज्या काही गोष्टी घडल्या, मग त्या चांगल्या असो किंवा वाईट, त्याच गोष्टींमुळे मी जी आज आहे ती आहे. याच चांगल्या वाईट गोष्टींमुळे माझ्या जीवनात बदल होत गेला. काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांना आपण काहीच करु शकत नाही.
तसेच बॉलीवुडमध्ये एडल्ट सिनेमांविषयी ती सारी जबाबदारी सरकारवर टाकतेय.तसंच सेक्सुअलिटी आणि एचआयव्हीबाबत परखडं बोलते.हॉट अदा आणि आयटम नंबर करणा-या सनीला आता काही तरी वेगळं करायचंय. सध्या ती तिच्या आयुष्यात रमली आहे. ब-याच दिवसांपासून रूपेरी पडद्यावर तिचे दर्शन घडले नसले तरीही तरी पर्सनल लाईफमध्ये सनी सध्या खूष आहे.