WHAT!! 'पोन्नियन सेल्वन १' आणि 'विक्रम वेधा' सिनेमांच्या तिकिटांचे दर ७५० रुपये?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 06:23 PM2022-09-27T18:23:08+5:302022-09-27T18:24:36+5:30

Ponnian Selvan 1 and Vikram Vedha movie : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचे 'विक्रम वेधा' आणि 'पोनियान सेल्वन' हे चित्रपट या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहेत.

WHAT!! 'Ponnian Selvan 1' and 'Vikram Vedha' movie tickets price Rs 750? | WHAT!! 'पोन्नियन सेल्वन १' आणि 'विक्रम वेधा' सिनेमांच्या तिकिटांचे दर ७५० रुपये?

WHAT!! 'पोन्नियन सेल्वन १' आणि 'विक्रम वेधा' सिनेमांच्या तिकिटांचे दर ७५० रुपये?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांचे 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) आणि 'पोनियान सेल्वन' (Ponnian Selvan 1)हे चित्रपट या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहेत. त्यामुळेच दोन्ही चित्रपटांचे निर्माते आपला चित्रपट हिट करण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबत आहेत. एकीकडे 'KGF Chapter 2' प्रमाणेच 'विक्रम वेधा' आणि 'PS1' च्या तिकीटाची किंमत चित्रपटाच्या बजेटइतकीच ठेवण्याचा विचार करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून निर्माते तिकीट दर कमी ठेवण्यावर भर देत आहेत.

तीन नॅशनल चेन म्हणजे PVR, Cinepolis आणि INOX. हिंदी चित्रपट व्यवसायात त्यांची एकूण ५० टक्के भागीदारी आहे. गंगूबाईप्रमाणेच विक्रम वेधाचे जे तिकीट दर असतील, त्याला तांत्रिकदृष्ट्या पॉप्युलर तिकीट किंमत म्हणतात. दरम्यान, नवरात्रीच्या दिवशी ब्रह्मास्त्र, धोका आणि चुपच्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांचे तिकीट दर फक्त १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिटाचे दर काय असतील याचा निर्णय निर्माते, वितरक, एग्झिबिटर्स तसेच तारे-तारकां एकत्र मिळवून ठरवतात. पण मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांच्या तिकिटांचे दर पुढील काही महिने जुन्याच धर्तीवर राहतील. विक्रम वेधा आणि पोन्नियन सेल्वन ही त्याची उदाहरणे आहेत. मल्टीप्लेक्समध्ये विक्रम वेधाचे तिकीट दर आलिया भट अभिनीत गंगूबाई काठियावाडी प्रमाणेच असणार आहेत. पहिल्या आठवड्यात बहुतेक मल्टिप्लेक्समध्ये विक्रम वेधाच्या तिकिटांची किंमत २०० ते ७५० रुपयांपर्यंत असणार आहे.

एग्झिबिटर्स आणि ट्रेड पंडितांच्या मते, विक्रम वेधा आणि पोन्नियन सेल्वन हे दोन्ही बिग बजेट चित्रपट आहेत. वीकेंडचा खर्च काढण्यासाठी त्यांना लोकप्रिय आणि ब्लॉकबस्टर तिकिटांची किंमत ठेवावी लागेल. सगळीकडे तिकिटांचे दर सारखेच असतील असे नाही. चित्रपटगृहाच्या परिसरानुसार तिकीटाचे दर राहतात. म्हणजेच या फॉरमॅटवर तिकिटाचे दर २०० रुपये ते ७५० रुपयांच्या घरात असतील.

विक्रम वेधाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, हा चित्रपट भारतात किती स्क्रीनवर येईल हे गुरुवारी कळेल. मात्र सध्याच्या रणनीतीनुसार तो भारतात ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याची तयारी झाली आहे. देशाबाहेर, १०० देशांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे, कारण हा बड्या स्टार्सचा बिग बजेट चित्रपट आहे. भारतात हिंदी चित्रपटांसाठी साडेपाच हजार स्क्रीन्स उपलब्ध असल्याने भारतातही तो मोठ्या प्रमाणावर रिलीज झाला आहे.

Web Title: WHAT!! 'Ponnian Selvan 1' and 'Vikram Vedha' movie tickets price Rs 750?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.