राधे प्रदर्शित होण्याआधीच सलमान खानच्या फॅन्सच्या मनात आली ही शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 16:13 IST2021-03-27T16:10:45+5:302021-03-27T16:13:43+5:30
सलमानचा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच या चित्रपटाविषयी काही उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

राधे प्रदर्शित होण्याआधीच सलमान खानच्या फॅन्सच्या मनात आली ही शंका
'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या सलमान खानच्या चित्रपटाची त्याचे चाहते गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
सलमानचा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच या चित्रपटाविषयी काही उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटाची कथा ही ओरिजनल नसून एका कोरियन मालिकेची कॉपी करण्यात आली असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
सँडग्लास ही मालिका कोरियामध्ये काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. या मालिकेत गँगस्टर, प्रॉसिक्यूटर आणि एका सुंदर मुलीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. सलमानचा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट देखील याच कथेवर आधारित असून सलमान गँगस्टर, रणदीप प्रॉसिक्यूटर आणि दिशा सुंदर मुलीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.
'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाच्या पोस्टरवरून ही चर्चा सध्या रंगली आहे. सलमानने याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. त्यामुळे आता ही कथा ओरिजनल आहे की कोरियन मालिकेची कॉपी हे प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सलमानने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे जाहीर केली होती. सलमानने 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यासोबत लिहिले होते की, ईदचे कमिटमेंट होते आणि ईदलाच येणार... कारण मी एकदा कमिटमेंट केली... हा चित्रपट बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच 13 मे ला प्रदर्शित होणार आहे...