सध्या काय करतेय रानू मंडल?, रेल्वे स्टेशनवरून थेट मिळाला प्लेबॅक सिंगर म्हणून बॉलिवूडमध्ये ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:42 PM2020-12-12T12:42:00+5:302020-12-12T12:42:28+5:30
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळं रानू एका रात्रीत सेलिब्रिटी झाली होती.
रानू मंडल तुमच्या लक्षात आहे ना... रानू मंडलने सोशल मीडिया किती शक्तिशाली आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. खरेतर रानू मंडलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात ती बंगालच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे एक प्यार का नगमा है... हे गाणे गात होते. तिचे हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते आणि एका रात्रीत रानू मंडल लोकप्रिय झाली. इतकेच नाही तर संगीतकार हिमेश रेशमियांने त्याच्या सिनेमात गाणी गाण्याची संधी दिली होती. हिमेशसोबतचे तेरी मेरी कहानी हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.
रानू मंडलचे पहिले गाणे मागील वर्षी रिलीज झाले होते मात्र त्यानंतर ती गायब झाली आहे. लोकांना जाणून घ्यायचे आहे की सध्या रानू मंडल काय करते आहे. रानू मंडल आता बंगाली गायक रुपांकर बागची होस्ट करत असलेल्या एका शोमध्ये दिसणार आहे. या शोचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यात रानू मंडल सागर किनारे हे गाणे गाताना दिसते आहे. रानू आणि रुपांकर बागची २ जानेवारीला एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक शो करताना दिसणार आहे. यात दोघे आपल्या सुरांची मैफल रंगवणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या रानू मंडल रानाघाट येथील जुन्या घरात राहते आहे. लॉकडाउनमध्ये रानू मंडलला घर चालवणे कठीण झाले होते ज्यानंतर तिने पुन्हा जुन्या घरी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
तिला बॉलिवूडमध्ये गाण्याची संधीदेखील मिळत नाही आहे. त्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.