WHAT!! संजूबाबानं चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 02:38 PM2022-07-30T14:38:07+5:302022-07-30T14:38:44+5:30

Sanjay Dutt And Amitabh Bachchan : संजय दत्त आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघांनाही पडद्यावर एकत्र पाहणे लोकांना आवडते. पण एक वेळ अशी आली जेव्हा संजयने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

WHAT!! Sanju Baba refused to work with Amitabh Bachchan | WHAT!! संजूबाबानं चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास दिला होता नकार

WHAT!! संजूबाबानं चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास दिला होता नकार

googlenewsNext

बॉलिवूडच्या चाहत्यांना २०२२ मधील आणखी काही आठवायचे असो वा नसो, पण एक अभिनेता नक्कीच लक्षात राहीला तो म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt). एप्रिलमध्ये, 'केजीएफ चॅप्टर २' मध्ये संजय दत्तला अधीराची भूमिका करताना पाहून लोक थक्क झाले होते. त्यानंतर त्याने 'शमशेरा' चित्रपटात साकारलेला इन्स्पेक्टर शुद्ध सिंग रसिकांना भावला. पुन्हा एकदा अशा खतरनाक लूकमध्ये तो दिसला की लोक आश्चर्यचकित झाले. ६३ वा वाढदिवस साजरा करत असलेल्या संजय दत्तने यावर्षी लोकांना एक जबरदस्त सरप्राईज दिले आहे. या वर्षी केवळ हे दोनच चित्रपट आले नाहीत, तर संजयने नेहमीच स्वत:साठी जे पात्र निवडले ते पूर्ण मेहनतीने साकारले. संजयची कारकीर्द पाहता त्याने कधीही नकारात्मक भूमिका किंवा दोन नायकांचे चित्रपट करण्यास आक्षेप घेतला नसल्याचे समजते. चित्रपटात दोन नायक असोत वा अनेक, पण संजय नेहमी त्याच्या भूमिकेला योग्य तो न्याय देताना दिसतो. पण तुम्हाला माहित आहे का की त्याने बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला होता. हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल ना...की नेमकं काय घडलं होतं त्यांच्यात. 

अमिताभ बच्चन यांचा 'खुदा गवाह' हा जबरदस्त हिट चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत श्रीदेवी, नागार्जुन आणि शिल्पा शिरोडकरही होते. मात्र, या चित्रपटात नागार्जुनऐवजी इन्स्पेक्टरची भूमिका यापूर्वी संजय दत्त करणार होता. दिग्दर्शक मुकुल आनंदच्या या चित्रपटासाठी त्याला फक्त रोलची ऑफरच आली नव्हती, तर त्याने काही दिवस शूटिंगही केले होते. निर्माते मनोज देसाई यांनी सांगितले की, या चित्रपटात संजय दत्तसोबत फराह नाझ देखील होती. दोघांसोबत जे शूट करण्यात आले ते ७ रीलमध्ये होते. नंतर संजय दत्तने चित्रपट सोडल्यामुळे या सातही रील उद्ध्वस्त झाल्या.


अमिताभ बच्चन आणि मुकुल आनंद यांचा 'हम' पाहिल्यानंतर संजय असुरक्षित झाल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. रजनीकांत आणि गोविंदाच्या पात्रांना त्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या विरुद्ध कमी पडद्यावर वेळ देण्यात आल्याचे त्यांना वाटले. त्यामुळेच अमिताभ बच्चन असतील तर चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेकडे फारसे लक्ष दिले जाणार नाही, असे ते म्हणाले.


मात्र, 'खुदा गवाह'चे निर्माते मनोज देसाई यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, खरे कारण काहीतरी वेगळेच आहे. संजय दत्तच्या 'थानेदार' चित्रपटातील 'तम्मा तम्मा लोगे' हे गाणे मूळ अमिताभ बच्चन यांच्या 'चुम्मा चुम्मा देदे' या गाण्यासाठी तयार करण्यात आले होते. संजयचा याच्याशी काहीही संबंध नव्हता, पण तो चित्रपटाचा नायक असल्याने आणि 'हम'चा दिग्दर्शक 'खुदा गवाह' बनवत असल्याने त्याला या गाण्यावरून खूप त्रास दिला गेला. मनोज देसाई यांनी सांगितले की, संजय इतका कंटाळला होता की, एके दिवशी तो अमिताभ बच्चन यांच्या व्हॅनमध्ये गेला आणि त्यांना 'सॉरी' बोलून चित्रपट सोडून गेला.
संजय दत्त आणि अमिताभ बच्चन यांनी नंतर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. नंतर ते 'अलादीन', 'हम किसी से कम नहीं', 'दीवार' आणि 'एकलव्य' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले.

Web Title: WHAT!! Sanju Baba refused to work with Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.