वयाच्या 84 वर्षांतही सळसळता उत्साह आणि जोष आजही कायम, धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 12:19 PM2021-02-01T12:19:36+5:302021-02-01T12:22:39+5:30

रमपाजीं सोशल मीडियावर सक्रीय असून तिथंही त्यांचे अनेक चाहते आहेत. खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही ते खूप सजग आहेत. त्यामुळेच की काय 84 वर्षांचे असलं तरी आपल्या फिटनेसमुळे आजच्या अनेक तरुणांना ते  कडवी टक्कर देतात. 

What is the secret of excellent fitness of Dharmendra At The Age Of 84 | वयाच्या 84 वर्षांतही सळसळता उत्साह आणि जोष आजही कायम, धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

वयाच्या 84 वर्षांतही सळसळता उत्साह आणि जोष आजही कायम, धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या अभिनयाने ८०च्या दशकात एकाहून एक सरस चित्रपट देणारे आणि आजतागायत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारे सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत धर्मेंद्रपाजी यांच्या यशाचे खरं कारण असून याच नियमांनी त्याचे आयुष्य ते जगतात. 


कुणी त्यांना बॉलीवूडचे हिमॅन म्हणतं तर कुणी वीरू रसिकांनी धरमपाजींवर कायमच प्रेम केलं आहे. आजही धर्मेंद्र यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. धरमपाजीं सोशल मीडियावर सक्रीय असून तिथंही त्यांचे अनेक चाहते आहेत. खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही ते खूप सजग आहेत. त्यामुळेच की काय 84 वर्षांचे असले तरी आपल्या फिटनेसच्याबाबतीत आजच्या तरुणांनाही ते  कडवी टक्कर देतात. 

फिट राहाण्यासाठी धर्मेंद्र या वयातही बरीच मेहनत घेतात. नुकतेच चाहत्यासह सोशल मीडियावर त्यांना त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये घरातच ते वर्कआउट करताना दिसत आहेत. सध्या धर्मेंद्र निसर्गाच्या सानिध्यात त्यांच्या फार्महाऊसमध्येच निवांत वेळ एन्जॉय करत आहेत. फार्महाऊसमध्ये नित्यनियमाने ते वर्कआऊट करत आहेत.आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.

 

शहराच्या गर्दीपासून दूर जेव्हा निवांत श्वास घ्यायचा असतो त्यावेळी धर्मेंद्र फार्महाऊसवरच जातात. काही वर्षांपासून धर्मेंद्र येथे सेंद्रीय शेती करत आहे. याशिवाय सेंद्रीय उत्पादन वापराला ते प्रोत्साहन देत असतात.शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गायी-म्हशी आहेत.फार्महाऊसमध्ये एक मोठा हॉल आहे.घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत.या आलिशान फार्महासमध्येच राहणे जास्त पसंत करतात.

Web Title: What is the secret of excellent fitness of Dharmendra At The Age Of 84

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.