​सुशांत-अंकिताच्या ब्रेकअप मागे आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2016 04:49 PM2016-05-05T16:49:14+5:302016-05-05T22:19:14+5:30

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपवर अखेर शिक्कामोर्तब झाले. या ब्रेकअपपेक्षा या ब्रेकअप होण्यामागच्या कारणांचीच जास्त चर्चा ...

What is Sushant-Ankita's breakup behind? | ​सुशांत-अंकिताच्या ब्रेकअप मागे आहे तरी काय?

​सुशांत-अंकिताच्या ब्रेकअप मागे आहे तरी काय?

googlenewsNext
शांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपवर अखेर शिक्कामोर्तब झाले. या ब्रेकअपपेक्षा या ब्रेकअप होण्यामागच्या कारणांचीच जास्त चर्चा झाली.   अंकिता खूप पझेसिव्ह असल्यामुळे सुशांत तिच्यापासून दूर गेला, अशी चर्चा रंगली. कधी सुशांतचे त्याच्या को-स्टारसोबतचे अफेअर तर कधी अंकिताचे अक्लोहॉलिक असणे अशी कारणेही सांगितली गेलीत. यावर अखेर सुशांतलाच खुलासा करावा लागला. ती ना अल्कोहॉलिक होती ना मी बाहेरख्याली...लोक विभक्त होतात, हे दु:खद आहे. हा सगळा काळाचा महिमा आहे, असे टिष्ट्वट सुशांतने बुधवारी केले. अर्थात सुशांतच्या या टिष्ट्वटनंतरही अंकिता व सुशांतच्या ब्रेकअपमागच्या कारणांची चर्चा थांबली नाही. नव्या बातमीनुसार, अंकिताला सुशांतसोबत सेटल होऊन फॅमिली पुढे वाढवायची होती. तर सुशांत यासाठी राजी नव्हता. याशिवाय सुशांतमुळे एक मोठा प्रोजेक्ट अंकिताला गमवावा लागला होता, यामुळेही ती नाराज होती. ज्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटाने सुशांतने बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. या हाऊसचा चित्रपट सुशांतमुळे अंकिताच्या हातून गेला. या प्रॉडक्शन हाऊसचे तीन चित्रपट सुशांतने मध्येच सोडून दिले होते. त्याचा फटका अंकिताला बसला. आता खरे काय नि खोटे काय, हे ठाऊक नाही. पण सुशांत व अंकिताचे ब्रेकअप झाले, हे मात्र खरे आहे.

 

Neither she was an alcoholic nor I am a womaniser . People do Grow apart & its unfortunate . Period!!? Sushant S Rajput (@itsSSR)  
 

Web Title: What is Sushant-Ankita's breakup behind?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.