असे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्याला चक्क पत्नीला पाठीवर बसवून कारपर्यंत घेऊन जावे लागले?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 12:22 PM2018-04-15T12:22:24+5:302018-04-15T17:52:33+5:30

अभिनेता अरुणोदय सिंगचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, त्यामध्ये तो आपल्या पत्नीला पाठीवर बसवून कारपर्यंत घेऊन जाताना दिसत आहे.

What would have happened, that the actor had to take a wife on the back and take it to the car? | असे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्याला चक्क पत्नीला पाठीवर बसवून कारपर्यंत घेऊन जावे लागले?

असे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्याला चक्क पत्नीला पाठीवर बसवून कारपर्यंत घेऊन जावे लागले?

googlenewsNext
िनेता अरुणोदय सिंगचा ‘ब्लॅकमेल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपटातील रंजित अरोरा नावाची त्याची भूमिका चांगलीच पसंत केली जात आहे. दुसºयांदा तो अभिनेता इरफान खानसोबत बघावयास मिळत आहे. या अगोदर हे दोघे २०११ मध्ये आलेल्या ‘ये साली जिंदगी’ या चित्रपटात बघावयास मिळाले होते. दरम्यान, सध्या अरुणोदय सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यास मोठ्या प्रमाणात बघितले जात आहे. होय, या व्हिडीओमध्ये अरुणोदय चक्क पत्नी एल्टनला पाठीवर बसवून कारपर्यंत घेऊन जाताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आल्याने सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले की, पार्टीत थकल्यामुळेच अरुणोदय आपल्या पत्नीला पाठीवर बसवून कारकडे घेऊन जात आहे. खरंच हा व्हिडीओ मजेशीर असून, दोघेही त्यात मस्तीच्या मूडमध्ये बघावयास मिळत आहेत. 

अरुणोदयची उंची जवळपास ६.३ फूट आहे. शिवाय तो फिट असल्याने पत्नीला पाठीवर घेऊन जाणे त्याला सहज शक्य झाले. अरुणोदय वरिष्ठ नेते तथा मध्य प्रदेशाचे माजी दिवंगत मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांचा नातू आहे. मात्र राजकारणात न जाता अभिनय क्षेत्रात तो नशीब आजमावत आहे. आतापर्यंत अरुणोदयने खूपच कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत म्हणावे तसे यश त्याला मिळविता आले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये अजूनही त्याची धडपड सुरू आहे. 
 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटात त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कारण त्याने त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिल्याचे दिसून येत आहे. अरुणोदयने ‘मोहोनजोदाडो, और मैं तेरा हिरो’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. अरुणोदयने २००९ मध्ये आलेल्या ‘सिकंदर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अरुणोदयच्या मते, चित्रपटात काम करण्याची मला अजिबात घाई नाही, त्यामुळे मी नेहमीच चांगल्या भूमिकांच्या शोधात असतो. 

Web Title: What would have happened, that the actor had to take a wife on the back and take it to the car?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.