कुस्ती म्हणजे काय रे बाबा..!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2016 12:27 PM2016-06-29T12:27:24+5:302016-06-29T17:57:24+5:30

सुलतान या आगामी चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा एका कुस्तीपट्टूची भूमिका साकारत आहे. तिच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका ...

What is wrestling is that .. Baba .. !! | कुस्ती म्हणजे काय रे बाबा..!!

कुस्ती म्हणजे काय रे बाबा..!!

googlenewsNext
n style="line-height: 20px;">सुलतान या आगामी चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा एका कुस्तीपट्टूची भूमिका साकारत आहे. तिच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे. या चित्रपटात ती कुस्तीपट्टूची भूमिका साकारत असली तरी तिने आयुष्यात कधी कुस्तीच पाहिली नाहीये असे सांगतेय अनुष्का शर्मा. सुलतान या चित्रपटाबद्दल अनुष्काने सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...

* अनुष्का तू सुलतान या चित्रपटात कुस्तीपट्टूची भूमिका साकारत आहेस, या भूमिकेसाठी काही विशेष मेहनत घ्यावी लागली का?
 अनुष्का- सुलतान या चित्रपटात काम करण्याआधी मला कुस्ती या खेळाविषयी खूपच कमी माहिती होती. मला या चित्रपटासाठी विचारण्यात आल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा कुस्तीविषयी मला जितकी माहिती मिळवता येईल तितकी मिळवली. कोणतीही भूमिका साकारताना तिच्यावर मेहनत घेणे हे गरजेचे आहे असे मला वाटते. मला नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची खूप आवड आहे आणि त्याचाच फायदा मला या भूमिकेसाठी झाला. मी कुस्तीविषयी सगळी पुस्तके वाचली. टिव्हीवर कुस्ती पाहिली. या सगळ्यातून माझी भूमिका अधिकाधिक चांगली साकारण्यास मला मदत झाली. तसेच सहा आठवडे तरी मी कुस्ती खेळण्याची ट्रेनिंग घेतली. माज्या लुकवर, तसेच देहबोलीवरही मी अभ्यास केला. कुस्ती खेळणे हे माज्यासाठी खूप कठीण होते. आपल्याला कोणी अनोळखी व्यक्तीने स्पर्श केला तर आपण लगेचच भडकतो, कुस्ती खेळताना तर सतत स्पर्श होतच असे. त्यामुळे ही गोष्ट माज्या मनाला समजवायला वेळ लागला. 

* सलमान खानच्या चित्रपटात अभिनेत्रीला महत्त्व नसते असे म्हटले जाते, तू याविषयी काय सांगशील
 अनुष्का- सुलतानमध्ये सलमान इतकीच माझीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या चित्रपटात अभिनेत्रीला कमी महत्त्व आहे असे कधी मी म्हणणार नाही. आपली इंडस्ट्री ही गेल्या काही वर्षांत खूप बदलत आहे. स्त्रीप्रधान चित्रपट येत आहेत आणि प्रेक्षकांची त्यांना पसंतीही मिळत आहे. केवळ अभिनयक्षेत्रातच नव्हे तर तांत्रिक क्षेत्रातही स्त्रियांची संख्या खूप वाढत आहे याचा मला आनंदच आहे.

* अनुष्का बॉलिवुडमध्ये गॉडफादर नसतानाही स्थिरावणे किती कठीण आहे असे तुला वाटते
 अनुष्का- माज्या कुटुंबातील कोणीही बॉलिवुडमध्ये नसल्याने मला गॉडफादर असण्याचा प्रश्नच नव्हता. मी आज बॉलिवुडमध्ये जे काही स्थान प्राप्त केले आहे, ते स्वत:च्या हिमतीवर मिळवलेले आहे. गॉडफादर असण्याची गरज असते असे मला वाटत नाही. केवळ चांगला अभिनय करणे, मेहनत घेणे आणि आपल्या भूमिकेला योग्य न्याय देणे हे आवश्यक असते असे मला वाटते. 

* या चित्रपटानंतर कुस्तीपट्टू होण्याची इच्छा असणाऱया मुलींना काही फायदा होईल का
 अनुष्का- आपल्या देशात कुस्ती खेळण्याची इच्छा असणाऱया मुलींना त्यांच्या घरातून नेहमीच विरोध करण्यात येतो. खूपच कमी कुटुंबातील मंडळी आपल्या मुलीला कुस्ती खेळण्यासाठी पाठिंबा देतात. या चित्रपटामुळे लोकांचा कुस्तीकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी मला आशा आहे.

* एक अभिनेत्री आणि एक निमार्ती या दोन्ही गोष्टींमध्ये तू कोणती गोष्ट अधिक एन्जॉय करतेस
 अनुष्का- निमार्ती म्हणून चित्रपटाच्या सगळ्याच गोष्टींमध्ये लक्ष द्यावे लागते. अभिनय करत असताना केवळ आपली भूमिका साकारायची हे एकच काम असते. मी या दोन्ही गोष्टी एन्जॉय करते. एक कलाकार म्हणून चित्रपटाची कथा निवडताना तुम्हाला खूपच चोखंदळ असावे लागते. एकदा चित्रपट स्वीकारल्यानंतर तुम्ही चित्रपटाच्या कथेबाबत काहीही करू शकत नाही. पण निमार्ती असताना प्रत्येक टप्प्यावर कथा अधिकाधिक करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता हा सगळ्यात मोठा फायदा निर्मितीचा आहे असे मला वाटते. 
 

Web Title: What is wrestling is that .. Baba .. !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.