रणबीर कपूर, सोनम कपूर, टायगर श्रॉफने २५ वर्षांपूर्वी केले होते एकत्र काम; व्हिडीओ पाहून बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:26 PM2019-03-26T14:26:58+5:302019-03-26T14:35:20+5:30

सोनम कपूर, रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफ हे आजचे आघाडीचे स्टार एकत्र चित्रपट करणार की नाही, याचे उत्तर येणारा काळ देईल. पण सुमारे २५ वर्षांपूर्वी या तिघांनी एका व्हिडीओमध्ये एकत्र काम केले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

when 25 years back sonam kapoor ranbir kapoor and tiger shroff features in a video | रणबीर कपूर, सोनम कपूर, टायगर श्रॉफने २५ वर्षांपूर्वी केले होते एकत्र काम; व्हिडीओ पाहून बसेल धक्का!!

रणबीर कपूर, सोनम कपूर, टायगर श्रॉफने २५ वर्षांपूर्वी केले होते एकत्र काम; व्हिडीओ पाहून बसेल धक्का!!

googlenewsNext
ठळक मुद्दे२५ वर्षांपूर्वी रणबीर, सोनम, टायगर तिघेही बरेच लहान होते. त्याकाळात या तिघांनीही आपआपल्या पित्यासोबत राष्ट्रीय ऐक्यावर आधारित गाण्यात काम केले होते.

अनिल कपूर, ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ यांच्या काळजाचे तुकडे म्हणजे, सोनम कपूर, रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफ आजघडीला बॉलिवूडच्या टॉप स्टार्सपैकी एक आहेत. या तिघांपैकी सोनम आणि रणबीर दोघांनीही संजय लीला भन्साळींच्या ‘सावरियां’मधून एकत्र डेब्यू केला. तर टायगरने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. आजचे हे आघाडीचे स्टार एकत्र चित्रपट करणार की नाही, याचे उत्तर येणारा काळ देईल. पण सुमारे २५ वर्षांपूर्वी या तिघांनी एका व्हिडीओमध्ये एकत्र काम केले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.


२५ वर्षांपूर्वी रणबीर, सोनम, टायगर तिघेही बरेच लहान होते. त्याकाळात या तिघांनीही आपआपल्या पित्यासोबत राष्ट्रीय ऐक्यावर आधारित गाण्यात काम केले होते. १९९२-९३ साली मुंबईत झालेल्या दंगलीनंतर दूरदर्शनने सुभाष  घईसोबत मिळून एक राष्ट्रीय एकता व्हिडीओ बनवला होता. ‘सारा भारत ये कहे, प्यार की गंगा बहे’ नामक या म्युझिक व्हिडीओत यात त्याकाळातील सगळे गाजलेले स्टार्स होते. या गाण्यात जॅकी, अनिल आणि ऋषी या सगळ्यांनी आपल्या मुलांसोबत म्हणजेच टायगर, सोनम व रणबीरसोबत शॉट दिले होते. तिघेही अगदीच लहान होते, त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण होते. आमिर खान, सलमान खान, गोविंदा, नसीरूद्दीन शहा, चिरंजीवी, रजनीकांत असे सगळे या व्हिडीओत दिसले होते. देशात ऐक्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे गाणे बनवण्यात आले होते.
मोहम्मद अजीज, उदित नारायण, मनहर उदास आणि जॉली मुखर्जींनी हे गाणे गायले होते.

Web Title: when 25 years back sonam kapoor ranbir kapoor and tiger shroff features in a video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.