लग्नाच्या सोळाव्या वाढदिवशी अक्षयकुमार-ट्विंकल खन्ना एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 05:57 PM2017-01-17T17:57:27+5:302017-01-17T17:57:27+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व अभिनेत्रीची लेखिका झालेली ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला सोळा वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या १६ व्या ...
ब लिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व अभिनेत्रीची लेखिका झालेली ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला सोळा वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या १६ व्या वाढदिवशी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला अफलातून शुभेच्छा दिल्या आहेत. यात अक्षय व ट्ंिवकल एकमेकांना मारण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. ट्विटरवरून पोस्ट केलेल्या या शुभेच्छांमध्ये तिने लिहलेय, आम्ही दोघे एकमेकांंना मारण्याचा प्रयत्न करीत आहोत.
मिसेस फनी बोन्स व द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद या पुस्तकांची लेखिका असलेली ट्विंकल खन्ना हिने १६ वषार्पूर्वी अक्षय कुमारसोबत लग्न केले होते. दोघांमध्ये कोणतेही साम्ये नसल्याचे दोघेही मानतात. अक्षय कुमार विचारपूर्वक आणि आवश्यक असेल तेथेच बोलतो तर ट्ंिवकलचा स्वभाव याच्या अगदी उलट आहे. प्रत्येक गोष्टीवर ती आपले मत व्यक्त करीतच असते. अशातच तिने आपल्या लग्नाच्या १६ व्या वाढदिवशी एक जीआयएफ इमेज पोस्ट करीत ट्विट केलेय, ‘सोळा वर्षांपासून आम्ही एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करीत आहोत, मात्र आम्ही यात आतापर्यंत यशस्वी झालो नाहीत.’ जीआयएफ इमेजमध्ये अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना दोघेही मार्शल आर्टचा नमुना पेश करीत एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
मागील वर्षी कॉफी विद करण या शोमध्ये ट्विंकल खन्नाने आपल्या लग्नाच्या काही गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यावेळी मी केवळ १५ दिवसांसाठी अक्षयला आपला बॉयफ्रेन्ड बनविले होते असे तिने सांगितले होते. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी अक्षय व ट्विंकल कलाचूरी येथे आले होते. यावेळी केवळ १५ दिवसांसाठी कुणीतरी सोबत असावे असा विचार करून मी अक्षय सोबत राहिले. मात्र शूटिंग संपल्यावर जेव्हा मुंबईला परत आली तेव्हा अक्षयपासून ती दूर होऊ शकली नाही.
याच कार्यक्रमात अक्षय कुमार म्हणाला, मी ट्ंिवकलशी लग्नाची बोलणी केली, पण ती तयार झाली नाही. यावेळी तिचा ‘मेला’ हा चित्रपट येणार होता. तिला हा चित्रपट हिट होईल असा पूर्ण विश्वास होता. ट्विंकलने एक अट ठेवली, ती म्हणाली, मेला जर फ्लॉप झाला तर मी तुझ्याशी लग्न करेन. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तिने होकार दिला व माझ्याशी लग्न करावे लागले. याच कार्यक्रमादरम्यान माझी सासू डिंपल कापडियाला मी ‘गे’ असल्याचे वाटत होते असेही म्हणाला होता.

16 years of trying to kill each other and we still haven't succeeded:) #16thanniversary#partnersincrimepic.twitter.com/XqGWQ2BQAI— Twinkle Khanna (@mrsfunnybones) January 17, 2017 ">http://
}}}}16 years of trying to kill each other and we still haven't succeeded:) #16thanniversary#partnersincrimepic.twitter.com/XqGWQ2BQAI— Twinkle Khanna (@mrsfunnybones) January 17, 2017