Amitabh Bachchan :"दहा बाय दहाच्या खोलीत 8 जणांसोबत राहिलो, पगार 1640 रुपये"; बिग बींनी दिला आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 04:18 PM2022-11-30T16:18:20+5:302022-11-30T16:29:01+5:30
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये एक ट्विटर स्क्रीनशॉट शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे आलिशान बंगले, गाड्या आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. लग्जरी लाईफस्टाईल आहे. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना 1640 रुपये इतकाच पगार होता. एवढंच नाही तर दहा बाय दहाच्या छोट्याशा खोलीत ते आठ जणांसोबत राहायचे. स्वत: बिग बींनीच आपल्य़ा ब्लॉगमध्ये याचा खुलासा केला आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये एक ट्विटर स्क्रीनशॉट शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
कोलकातामधल्या ब्लॅकर्स कंपनीत 30 नोव्हेंबर 1968 हा बिग बींच्या कामाचा शेवटचा दिवस होता, असं ब्लॉगमध्ये लिहिलंय. ती फाइल त्यांनी आजपर्यंत सांभाळून ठेवली आहे. अमिताभ बच्चन यांनी "कलकत्तामधील (आता कोलकाता) ते दिवस.. फ्री.. फ्रीडम.. फ्रीइस्ट.. ते स्वतंत्रपणे, मुक्तपणे जगण्याचे दिवस होते. आठ लोक दहा बाय दहाच्या खोलीत राहायचो. मित्रांनो, ते सुद्धा काय दिवस होते! काम संपल्यावर मित्रांसोबत फिरायला जायचं."
T 4481 - जनता जनार्दनः .. My greatest and best Award ❤️ pic.twitter.com/iSJZq7KJOb
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 27, 2022
"लोकप्रिय हॉटेल्सच्या आत जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे. मात्र बाहेरच या आशेनं उभे राहायचो की एक दिवस आम्ही नक्कीच आत जाऊ आणि आम्ही हे करून दाखवलं. आम्ही आत गेलो, गेट कीपर्सना खूप विनंती केली. जेव्हा आमची वेळ चांगली असेल तेव्हा तुमची काळजी घेऊ असं त्यांना म्हणायचो. हाहाहा.. असं कधी झालं नाही" असं म्हणत जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.
अभिनयविश्वात पदार्पण केल्यानंतर सर्वच गोष्टी बदलल्याचं देखील ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. "जेव्हा नवीन प्रोजेक्ट मिळाला आणि शूटिंगसाठी शहरात जाऊ लागलो तेव्हा त्याच जागी जायचो. आता ते मेजवानी देतात आणि असा हा झालेला बदल.. त्या लोकांची झालेली भेट" असं ते म्हणाले. अमिताभ बच्चन हे ट्विटर आणि ब्लॉगच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. नवनवीन माहिती देत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"