"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 03:02 PM2024-05-29T15:02:09+5:302024-05-29T15:04:07+5:30
आलिया आणि इदा यांनी बाँडिंगबद्दल सांगितलं आहे. त्या दोघी बहिणींसारख्या आहेत आणि एकत्रच मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी शालेय शिक्षणही एकत्र घेतलं आहे.
अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. ती तिच्या पॉडकास्टसाठी लोकप्रिय आहे. अलीकडेच तिची बालपणीची मैत्रीण तिच्या पॉडकास्टमध्ये दिसली. ही मैत्रीण म्हणजे दिग्दर्शक इम्तियाज अलीची मुलगी इदा अली आहे.
Young, Dumb & Anxious या पॉडकास्टमध्ये आलिया आणि इदा यांनी त्यांच्या बाँडिंगबद्दल सांगितलं आहे. तिने सांगितलं की, त्या दोघी बहिणींसारख्या आहेत आणि एकत्रच मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी शालेय शिक्षणही एकत्र घेतलं आहे. यासोबतच त्यांनी आपल्या किडनॅपिंगची स्टोरी देखील सांगितली आहे. आम्ही घरी असल्यामुळे टेक्नीकली किडनॅप झालं नसल्याचं आलियाने सांगितलं.
आलियाने सांगितलं की, "दोघीही एकाच बिल्डिंगमध्ये राहत होत्या. एके दिवशी आई-वडील एकत्र बाहेर गेले होते आणि आम्ही घरी होतो. माझे आणि तिचे आई-वडील बाहेर गेले होते. इदा माझ्या घरी आली होती आणि माझी आजीही आमच्यासोबत होती. माझी आजी आमची काळजी घेत होती आणि आमच्या घरी त्यावेळी घरी काम करत असणारी दीदी देखील होती."
"माझे आई-वडील बाहेर गेल्यानंतर घरातील मदतनीसने माझ्या आजीला एका खोलीत बंद केलं होतं. त्यांनी माझ्या आणि इदाच्या तोंडावर टेप लावली होती आणि आमचे हात खुर्चीला बांधले होते. आम्ही खूप रडत होतो. टेन्शनमध्ये होतो कारण आम्हाला वाटलं की आता आम्ही मरणार आहोत."
"घरातील मदतनीसच आमच्या घरात चोरी करत होती. ती आमच्या घरातून पैसे आणि दागिने चोरत होती. पण सुदैवाने माझी आई घरी काहीतरी विसरली होती आणि ती 15 मिनिटांत परत आली. तिने सर्व काही पाहिलं आणि सर्वांना घरी परत बोलावलं. माझे वडील, इदाचे आई-बाबा सर्व परत आले. सगळे खूप टेन्शनमध्ये होते. हे अत्यंत ट्रॉमेटिक होतं. पण हे तेव्हा ट्रॉमेटिक होतं जेव्हा आम्ही संपूर्ण वेळ एकटे होतो."
यानंतर इदाने देखील त्यांना आलेल्या अनुभवावर भाष्य केलं आहे. "आता जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो तेव्हा आमच्याकडे सांगण्यासाठी एक मजेदार गोष्ट आहे" असं इदाने म्हटलं आहे. त्यावर आलिया म्हणाली की, "आता तो एपिसोड आठवून आठवून आम्ही हसतो."