हनिमूनला यायचं हं! बिपाशाने सलमानला दिलं होतं मधुचंद्राचं आमंत्रण; करण झाला होता शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 02:46 PM2024-06-18T14:46:56+5:302024-06-18T14:48:00+5:30

Bipasha basu: बिपाशाचं वाक्य ऐकून करण सिंह ग्रोवरला बसला होता धक्का

when-bipasha-basu-invited-salman-khan-to-join-her-on-her-honeymoon-with-karan-singh-groverwhen-bipasha-basu-invited-salman-khan-to-join-her-on-her-honeymoon-with-karan-singh-grover | हनिमूनला यायचं हं! बिपाशाने सलमानला दिलं होतं मधुचंद्राचं आमंत्रण; करण झाला होता शॉक्ड

हनिमूनला यायचं हं! बिपाशाने सलमानला दिलं होतं मधुचंद्राचं आमंत्रण; करण झाला होता शॉक्ड

बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत येत असलेलं कपल म्हणजे बिपाशा बासू ( bipasha basu) आणि करण सिंह ग्रोवर. ३० एप्रिल २०१६ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली असून त्यांना एक गोड लेक सुद्धा आहे. त्यामुळे ही जोडी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या सोशल मीडियावर बिपाशा आणि करणच्या लग्नाचा एक किस्सा चर्चिला जात आहे. या लग्नात बिपाशाने चक्क सलमानला (Salman Khan) हनिमूनचं आमंत्रण दिलं होतं.

बिपाशा आणि करण (Karan Singh Grover) यांचं लग्न झाल्यानंतर त्यांनी रिसेप्शन पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये सगळ्यात शेवटी सलमान खान आला होता. ज्यावरुन बिपाशा, करण आणि सलमानमध्ये मज्जामस्करी सुरु होती. आनंदाच्या वातावरणात बिपाशाने मजेमध्ये चक्क सलमानला हनिमूनला येण्याचं आमंत्रण देऊन टाकलं. एका मुलाखती बिपाशा आणि सलमानने हा किस्सा सांगितला होता.

सलमानला कायम त्याच्या लग्नावरुन प्रश्न विचारले जातात. त्यामुळे बिपाशाच्या लग्नातही मीडियाने त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारले होते.यावेळी बिपाशाने सलमानची बाजू घेत मजेशीर वक्तव्य केलं होतं. "माझ्या लग्नात येऊन त्याने माझी सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण केली आहे. आणि, आता तो आमच्या हनिमूनमध्येही आम्हाला जॉइन करणार आहे", असं मस्करीमध्ये बिपाशा म्हणाली. परंतु, यावेळी करणची रिअॅक्शन पाहण्याजोगी होती.

दरम्यान, बिपाशा आणि सलमान यांची खूप चांगली मैत्री आहे. या दोघांनी नो एंट्री या सिनेमात एकत्र काम केलं होतं.  इतकंच नाही तर त्याने बिपाशाला लग्नात १० कोटींचा फ्लॅट गिफ्ट म्हणूनही दिल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण बिपाशाने दिलं होतं.

Web Title: when-bipasha-basu-invited-salman-khan-to-join-her-on-her-honeymoon-with-karan-singh-groverwhen-bipasha-basu-invited-salman-khan-to-join-her-on-her-honeymoon-with-karan-singh-grover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.