जेव्हा दारूच्या नशेत बेधुंद झाली होती दीपिका पदुकोण, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

By सुवर्णा जैन | Published: September 22, 2020 10:50 AM2020-09-22T10:50:32+5:302020-09-22T10:52:27+5:30

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला समन्स पाठवले आहे.

when Deepika Padukone Caught DRUNK With Her Friends, You Will Be Shocked To See This Photo | जेव्हा दारूच्या नशेत बेधुंद झाली होती दीपिका पदुकोण, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

जेव्हा दारूच्या नशेत बेधुंद झाली होती दीपिका पदुकोण, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

googlenewsNext

रात्री दारूच्या नशेत धुंद होऊन क्लबमध्ये जाऊन पार्टी करणे हे सर्रास कलाकारांच्या बाबतीत पाहायला मिळते. लक्झरी लाईफस्टाइलच्या नावाखाली अनेक अभिनेत्री मीडिया समोर दारूच्या नशेत पोज देताना दिसतात. मीडियाचे कॅमेरे त्या्ंच्यासाठीच थांबले आहेत याची कल्पना असतानाही अभिनेत्री दारूच्या नशेत बिनधास्त समोर येतात. त्यांना स्वतःला सावरणेही कठिण जात असते अशी त्यांची अवस्था झाल्याचे पाहायला मिळते. 

 

हे तेच सेलिब्रेटी आहेत ज्यांना त्यांचे चाहते रोल मॉडल मानतात. बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनमध्ये  बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोणचेही नाव समोर येताच अनेकांना धक्काच बसला असणार. इंटरनेटवर दीपिकाचे नशेत धुंद असल्याचे अनेक फोटो पाहायला मिळतात. दारूच्या नशेत दीपिकाचे फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

करण जोहर आणि मनीष मल्होत्रा यांच्या पार्टीत दीपिका फुल ऑन दारूच्या नशेत बुडाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे जुने फोटो असले तरी ड्रग्स कनेक्शनमध्ये दीपिकाचे नाव समोर आल्यापासून तिचे असे फोटो पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झाले आहेत. ड्रग्स कनेक्शनमध्ये दीपिका व्यतिरिक्त आणखीन बडया अभिनेत्रींची नावं  सामिल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला समन्स पाठवले आहे. त्यांची याच आठवड्यात चौकशी होऊ शकते. 

‘रिपीट आफ्टर मी, ड्रग्ज सेवनाचा परिणाम आहे डिप्रेशन, कंगनाचा दीपिकावर निशाणा


दीपिकाचे नाव न घेता कंगनाने तिच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव समोर येताच कंगनाने ट्विट केले.काही दिवसांपूर्वी दीपिकाने डिप्रेशनसंदर्भात ‘रिपीट आफ्टर मी’ नावाची एक पोस्ट केली होती. सोशल मीडियावर तिच्या या पोस्टची बरीच चर्चा रंगली होती. दीपिकाच्या या पोस्टचा आधार घेत कंगनाने तिला जोरदार टोला लगावला.

 

 

‘रिपीट आफ्टर मी, ड्रग्ज सेवनाचा परिणाम आहे डिप्रेशन. तथाकथित उच्चभू्र स्टार्सची मुले जे क्लासी आणि संस्कारी दावा करतात, ते आपल्या मॅनेजरला विचारतात, माल है क्या?’, असे ट्विट कंगनाने केले आहे. आपल्या या ट्विटमध्ये तिने दीपिकाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण तिचा इशारा दीपिकाकडेच आहे, हे स्पष्ट आहे.

आगामी काळातही मला जे योग्य वाटेल ते मी तितक्याच प्रामाणिकपणे, निष्ठेने करत राहणार


लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने तिच्या स्ट्रगलविषयी सांगितले होते, तेव्हा तिने सांगितले होते की, मला माझ्या जीवनात कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाही. सिनेमा किंवा अभिनयाची पार्श्वभूमी नसताना तसंच बंगळुरूसारख्या शहरातून या चित्रपटसृष्टीत आले. इथे आल्यानंतर आजवर मी विविध चित्रपटांमध्ये काम केले. त्यात काही वेळा माझी निवड योग्य ठरली असेल काही वेळा चुकलीही असेल. मात्र या सगळ्या प्रवासात मी काही ना काही शिकत होते. कारण माझ्यासाठी सारं काही नवीन होतं.

कॅमेरा, लाइट यापैकी कुठलीच गोष्ट मला माहित नव्हती. बऱ्याचदा लोकांना माझ्या दाक्षिणात्य उच्चारांवर आक्षेप होता. तरीही मी काम करत गेले आणि शिकत गेले. सुरुवातीच्या काळात लोकांनी टीकाही केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत मी काम करत गेले. त्यामुळे आजवर मी जे काही आहे, जे काही यश मिळालं आहे त्यात मी काम केलेल्या चित्रपटांचं मोठं योगदान आहे.  त्यामुळे आगामी काळातही मला जे योग्य वाटेल ते मी तितक्याच प्रामाणिकपणे, निष्ठेने करत राहणार आहे.

Web Title: when Deepika Padukone Caught DRUNK With Her Friends, You Will Be Shocked To See This Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.