सिनेमात बिकिनी घालण्यापूर्वी इशाने घेतली होती आई-वडिलांची परवानगी; हेमा मालिनी म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:39 PM2023-08-31T13:39:17+5:302023-08-31T13:39:56+5:30
Esha Deol: अनेक अभिनेत्री बिनधास्तपणे बिकिनी परिधान करुन काही सीन देतात. परंतु, इशाने सिनेमात बिकिनी घालण्यापूर्वी आई-वडिलांची परवानगी घेतली होती.
बॉलिवूड अभिनेत्री इशा देओल (isha deol) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अभिनेता सनी देओल याचा गदर २ या सिनेमाचं इशाने स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. त्यानंतर ती एकाएकी चर्चेत आली. यामध्येच आता तिच्या २००४ साली प्रदर्शित झालेल्या 'धूम' सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमामध्ये इशा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. विशेष म्हणजे या सिनेमात इशाने बिकिनी परिधान केली होती. मात्र, हा सीन करण्यापूर्वी तिने आई-वडिलांची म्हणजेच धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (hema malini) यांची परवानगी घेतली होती.
आजकाल सिनेमामध्ये अभिनेत्रींनी बिकिनी परिधान करणं फार कॉमन गोष्ट झाली आहे. अनेक अभिनेत्री बिनधास्तपणे बिकिनी परिधान करुन काही सीन देतात. परंतु, इशाने सिनेमात बिकिनी घालण्यापूर्वी आई-वडिलांची परवानगी घेतली होती. विशेष म्हणजे इशाने बिकिनी घालण्याची परवानगी मागितल्यानंतर हेमा मालिनी यांनी थक्क करणारी प्रतिक्रिया दिली होती.
इशाने 'झूम'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या बिकिनी सीनविषयी आई-वडिलांची रिअॅक्शन काय होती हे सांगितलं. "मला वाटलं होतं सिनेमात बिकिनी परिधान करण्यापूर्वी आईची परवानगी घ्यावी. पण, ज्यावेळी मी तिच्याकडे परवानगी मागायला गेले तर, तिने मलाच उलट प्रश्न विचारला. तू सिरिअसली हे मला विचारतीयेस? तू मित्र-मैत्रिणींसोबत हॉलिडेवर जातेस त्यावेळी बिकिनी परिधान करतेस ना? आणि, मला माहित होतं मी कोणत्या लोकांसोबत शूट करतीये, असं इशा म्हणाली.
दरम्यान, इशाचा गेल्या काही काळात कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. २००८ साली ती हायजॅक या सिनेमात झळकली होती. त्यानंतर ती फारशी रुपेरी पडद्यावर झळकली नाही. मात्र, अलिकडेच तिची एक दुआ ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली.