प्रसिद्ध अभिनेत्रीची गर्दीत हालत झाली होती खराब, फॅनने फाडले होते कपडे आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:20 PM2023-03-08T12:20:47+5:302023-03-08T12:26:07+5:30
Bindiya Goswami : बिंदिया गोस्वामी 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मोठ्या स्टारसोबत तिने काम केलं. तिचे अनेक सिनेमे आणि अनेक भूमिका गाजल्या.
Bindiya Goswami : बॉलिवूड स्टार्सची एक झलक बघण्यासाठी फॅन्स आतुर असतात. आपल्या लाडक्या स्टार्सची झलक पाहण्यासाठी फॅन्स अनेकदा असं काही करतात की, स्टार्सना मोठा फटका सहन करावा लागतो. कुणी फोटो काढण्याच्या नादात कशाचीही चिंता करत नाहीत. आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री बिंदिया गोस्वामीला फॅन्समुळे लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागला होता.
बिंदिया गोस्वामी 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मोठ्या स्टारसोबत तिने काम केलं. तिचे अनेक सिनेमे आणि अनेक भूमिका गाजल्या. पण एकदा फॅनने गर्दीत असं काही केलं, जे ती आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.
बिंदियाच्या आयुष्यातील अनेक किस्से तुम्हाला माहीत असतील, पण हा किस्सा तुम्ही कधी ऐकला नसेल. गर्दीत तिचे कपडे फाटले होते. 1980 ची ही घटना आहे. त्यावेळी बिंदिया गोस्वामीच्या ‘टक्कर’ सिनेमाचा कोलकातामध्ये प्रीमियर शो होता. लोकांची खूप गर्दी झाली होती. जे बिंदियाला बघण्यासाठी आतुर झाले होते.
बिंदियाने 2018 मध्ये ‘फिल्मफेयर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्या प्रीमियरवेळी तिने लेस असलेला वेलवेटचा गाउन घातला होता. ती फारच सुंदर दिसत होती. तेव्हाच तिथे गर्दीतील कुणीतरी तिचा गाउन मागून खेचला. जो लगेच फाटला. गाउन फाटल्यामुळे तिची कंबर पूर्ण दिसू लागली होती. बिदिंया फार घाबरली होती. तेव्हा तिथे तिची बहीण पर्ल आली आणि तिने बिंदियाला सांभाळलं.
बिंदियासोबतचा आणखी एक किस्सा म्हणजे, बिंदिया गोस्वामीचा एक माथेफिरू फॅन तिच्या लेटर बॉक्समध्ये रोज एक लेटर टाकत होता. एकवेळा तर त्याने कारनामा केला. त्याने बिंदियाला लेटर लिहिलं आणि म्हणाला की, जर तिने त्याच्यासोबत लग्न केलं नाही तर तो तिच्या दारासमोर आत्महत्या करेल. या घटनेने ती फार घाबरली होती.