जेव्हा विदेशी पत्रकाराने म्हटले, ‘नमस्कार दीपिकाजी’ तेव्हा दीपिका पादुकोणने दिले ‘हे’ उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 04:25 PM2018-04-25T16:25:36+5:302018-04-25T21:55:45+5:30
गेल्या मंगळवारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी पत्रकारांनी तिला ‘नमस्कार दीपिकाजी’ असे म्हटले.
ब लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, टाइमच्या दुनियेत सर्वात शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दीपिकाच्या नावाला स्थान देण्यात आले आहे. गेल्या मंगळवारी न्यूयॉर्क येथे आयोजित केलेल्या ‘टाइम १००’ या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या सेरेमनीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक विदेशी पत्रकार दीपिकाला ‘नमस्कार दीपिकाजी’ असे म्हणताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या पत्रकाराचे बोल कानी पडताच दीपिकाही तिला उत्तर देताना दिसत आहे.
दीपिका हात जोडून त्या पत्रकाराचे अभिवादन स्वीकारते. दीपिकाचा हा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केला जात असून, चाहत्यांकडून त्यास तुफान कॉमेण्ट्स दिल्या जात आहेत. या कार्यक्रमात दीपिका डिप्रेशन आणि त्याचा सामना करीत असलेल्या लोकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण करताना बघावयास मिळाली. दरम्यान, टाइमच्या या यादीत बॉलिवूडमधून केवळ दीपिकालाच स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे दीपिकासाठी हा एक उच्च सन्मान असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, यावेळी दीपिका डिझायनर अनामिका खन्नाने डिझाइन केलेल्या स्टनिंग साडी गाउनमध्ये बघावयास मिळाली. या आउटफिटमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. भलेही दीपिकाने गाउन कॅरी केला, मात्र त्यास पूर्ण इंडियन साडीचा टच देण्यात आला होता. दरम्यान, दीपिका सध्या तिच्या विविध प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. मात्र त्या प्रोजेक्टपेक्षा ती तिच्या लग्नाच्या अफवांवरूनच अधिक चर्चेत आहे. लवकरच ती तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत लग्न करणार असल्याचे बोलले जाते.